महाराष्ट्र

maharashtra

Indian Air Force Day : भारतीय हवाई दलाला 91 व्या वर्धापन दिनी मिळाला नवीन ध्वज; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 7:46 PM IST

Updated : Oct 8, 2023, 8:07 PM IST

Indian Air Force Day : हवाई दलाच्या स्थापना दिनी नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलंय. भारतीय वायूदलाचा आज 91 वा स्थापना दिवस आहे.

Indian Air Force Day
Indian Air Force Day

वायू दलाला नवीन ध्वज

प्रयागराज Indian Air Force Day : भारतीय हवाई दलाचा आज 91 वा स्थापना दिवस आहे. या निमित्तानं वायू दलाला नवीन ध्वज मिळालाय. भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आलंय. विशेष म्हणजे 72 वर्षांनंतर हा बदल करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाला शुभेच्छा दिल्या. प्रयागराजमध्ये आज वायुसेना दिनानिमित्त एअर शोचं आयोजन करण्यात आलंय.




भारतीय हवाई दलाची वारसा जपण्याची जबाबदारी : भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी याप्रसंगी म्हणाले की, त्यांना त्यांच्या पूर्वजांनी चालविलेल्या व्यावसायिकता, दृढता आणि उत्कटतेचा वारसा अभिमानानं मिळालाय. वायुसेनेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गजांच्या योगदानाची त्यांनी यावेळी आठवण केली. ते म्हणाले की, ज्यांनी कर्तव्य करताना सर्वोच्च बलिदान दिलं त्यासर्व हवाई योद्ध्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांचा वारसा जतन करणं आणि ती मूल्यं जपणं ही आपली जबाबदारी आहे.

कसा आहे नवीन ध्वज :हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी परेडच्या वेळी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. या नवीन ध्वजावर उजव्या कोपर्‍यात भारतीय वायुसेनेचं चिन्ह असून त्यामध्ये हिमालयीन गरुड आणि अशोक स्तंभाचीही भर पडलीय. अशा नव्या रुपात आता भारतीय वायू दलाचा नवा ध्वज दिमाखात फडकवण्यात आलाय.

हवाई दलानं केला स्वदेशी क्षमतेचा विकास : यावेळी बोलताना वायुसेना प्रमुख म्हणाले की, मागील एका वर्षात भारतीय वायुसेनेसाठी अनेक आव्हानं आली. परंतू भारतीय वायुसेनेनं अतिशय चांगली कामगिरी केलीय. प्रत्येक चाचणी उड्डाणाच्या रंगांसह उत्तीर्ण केल्याचं पाहून त्यांना आनंद झाला. हवाई दलानं केवळ आव्हानांवर मात केली नाही, तर त्या आव्हानांचं संधींमध्ये रूपांतर केलंय. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत, हवाई दलानं स्वदेशी क्षमता विकसित करून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचंही वायुसेना प्रमुखांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं
  2. Anantnag Encounter : दहशतवाद्यांशी लढताना सैन्याच्या कर्नल, मेजरसह तीन अधिकाऱ्यांना वीरमरण
  3. Devendra Fadnavis News : सायबर गुन्हेगारी मोडून काढणार - देवेंद्र फडणवीस
Last Updated : Oct 8, 2023, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details