महाराष्ट्र

maharashtra

India corona update देशात 24 तासात आढळले 16561 रुग्ण, कोरोना रुग्णसंख्येत घट

By

Published : Aug 12, 2022, 10:49 AM IST

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. रुग्णांना कोणत्या व्हेरियंटची लागण झाली आहे याची माहिती मिळण्यासाठी जिनोम सिकवेंसिंग चाचण्या केल्या जात आहेत. दुसरीकडे देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे.

India corona update
India corona update

मुंबई- देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी India corona update ) झाली आहे. 24 तासात 16561 रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1,25,076 वरून 1,23,535 इतकी झाली ( corona patients in India ) आहे.

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( Spread of corona virus ) आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. रुग्णांना कोणत्या व्हेरियंटची लागण झाली आहे याची माहिती मिळण्यासाठी जिनोम सिकवेंसिंग चाचण्या ( Genome sequencing tests ) केल्या जात आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने १४ व्या फेरीत २३० नमुन्यांची तपासणी केली असता त्यात १०० टक्के रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Omicron variant ) बाधा झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना नियमांचे पालन करा - दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, कोविड - १९ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

BA २.७४ व्हेरिएन्टचे सर्वाधिक रुग्ण -कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय जिनोम सिकवेंसिंग चाचण्या केल्या जात आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पश्चिम उपनगरे डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिका क्षेत्रातील २३० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. २३० नमुन्यांपैकी २८ टक्के अर्थात ६४ नमुने हे BA २.७४ व्हेरिएन्टचे ( Most patients with BA variant ) आहेत. २० टक्के अर्थात ४५ नमुने हे B A २.७५ व्हेरिएन्टचे आहेत. आणखी २० टक्के म्हणजेच ४५ नमुने हे BA २.७६ व्हेरिएन्टचे आहेत. तर १२ टक्के अर्थात २८ नमुने हे BA २.३८ व्हेरिएन्टचे आहेत. ८ टक्के म्हणजेच १९ नमुने हे BA ५ व्हेरिएन्टचे आहेत. तर ७ टक्के अर्थात १८ नमुने हे इतर व्हेरिएन्टचे आहेत. ४ टक्के म्हणजेच ९ नमुने हे BA २.३८.१ व्हेरिएन्टचे आहेत. तर १ टक्के अर्थात २ नमुने हे BA ४ व्हेरिएन्टचे आहेत.

हेही वाचा-Couple names daughter India, स्वातंत्र्याचा अनोखा अमृत महोत्सव, मुलीचे नाव ठेवले इंडिया

ABOUT THE AUTHOR

...view details