महाराष्ट्र

maharashtra

MP Love Jihad: अनामिका दुबे झाली उज्मा फातिमा... आई-वडिलांनी जिवंतपणीच मुलीचे केले पिंडदान, छापल्या श्रद्धांजलीच्या पत्रिका

By

Published : Jun 14, 2023, 1:56 PM IST

जबलपूरमध्ये मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे पिंड दान केले. नातेवाईकांनी तिची समजूत काढल्यानंतर तिने कोर्टात जाऊन मुस्लीम मुलाशी लग्न केले. लग्नासाठी तिने आपला धर्म बदलला.

मध्यप्रदेशात जिवंत मुलीचं पिंड दान
मध्यप्रदेशात जिवंत मुलीचं पिंड दान

जबलपूर : मध्यप्रदेशातील जबलपूरमध्येही एका कुटुंबाने जिवंत असलेल्या मुलीचे पिंडदान केले आहे. हो, तुम्ही जे वाचलं ते बरोबर वाचले आहे. कारण मुलगी जिवंत असून सुद्धा कुटुंबियांनी तिचे पिंड दान केले. यासाठी त्यांनी शोकपत्र देखील छापले होते. मुलगी जिवंत असतानाही घरच्यांनी असे कृत्य का केले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचे कारण आहे, तिचे लग्न. पण तिने एका मुस्लीम मुलाशी लग्न केल्याने घरच्यांनी तिचे विधीपूर्वक पिंडदान केले.

समजूत काढल्यानंतरही लग्न केले :दरम्यान तिने लग्न करुन नये,यासाठी तिच्या नातेवाईकांनी तिची समजूत काढली होती. परंतु जिद्दीला पेटलेल्या पोरीने मॅजिस्ट्रेटसमोर कोर्टात लग्न केले. त्यानंतर मुस्लिम परंपरेनुसार 7 जूनला अनामिका दुबेची उज्मा फातिमा झाली आणि निकाह केला. त्यामुळे नाराज झालेल्या कुटुंबियांनी रविवारी गौरीघाटावर पिंड दान करून आमरणोत्सवही आयोजित केला होता.

अनामिका दुबेपासून उज्मा फातिमा बनली : मध्य प्रदेशातून धर्मांतर आणि लव्ह जिहादची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. त्यात जबलपूरमधून ही घटना समोर आली आहे. परंतु मुलीने स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर केले आहे. या मुलीचे नाव आहे अनामिका दुबे. अनामिका जबलपूरमधील अमखेरा भागात राहते. काही महिन्यांपूर्वी मोहम्मद अयाज नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. प्रेमात इतकी बुडाली होती तिने थेट आपला धर्मच बदलून घेतला. निकाल म्हणजे लग्न करताना अनामिका दुबे ही उज्मा फातिमा बनली. अनामिकाच्या निर्णयावर नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीचा त्याग केला आणि तिच्या निधनाबद्दल शोकसंदेश छापला. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना शोकपत्र पाठवून नर्मदेच्या काठावर आयोजित पिंड दानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. शोकसंदेशात मुलीच्या नातेवाइकांनी तिला कूपुत्री मुलगी म्हटले आहे. नरकात जाणाऱ्या आत्म्याला शांती मिळावी असे प्रार्थना त्यांनी केली होती.

कुटुंबीयांनी केले पिंडदान : नर्मदेच्या तीरावर असलेल्या गौरीघाटावर रविवारी कुटुंबियांनी पिंडदानाचा विधी केला. मुलगी अनामिका हिचे त्यांनी मोठ्या प्रेमाने पालनपोषण केले होते. मात्र मुस्लिम धर्माच्या तरुणाशी लग्न करून संपूर्ण कुटुंबाचीच बदनामी केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांची मुलगी जिवंत राहण्यात अर्थ उरला नाही. मुलीचा भाऊ अभिषेक दुबे म्हणतो की, "त्याने बहिणीच्या लग्नाची स्वप्ने पाहिली होती, पण तिच्या जिद्दीने सर्व स्वप्ने भंग झाली. असा दिवस येईल असा कधी विचार केला नव्हता. ती जिवंत असतानाही तिचे पिंडदान करावे लागेल, हे वाटले नव्हते."

ABOUT THE AUTHOR

...view details