महाराष्ट्र

maharashtra

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचं कोरोनाने निधन

By

Published : May 18, 2021, 1:09 PM IST

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल होते.

former-national-president-of-ima-dr-kk-aggarwal-died-due-to-covid-19
डॉ. केके अग्रवाल

नवी दिल्ली- इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते.

लसीचे दोन डोस केले होते पूर्ण -

डॉ. केके अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अग्रवाल यांना कोरोना झाल्यानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. केके अग्रवाल यांनी 28 एप्रिलला आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.

ट्विटरवरून कुटुंबीयांची माहिती -

डॉ. केके अग्रवाल यांच्या निधनाची अधिकृत माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरवरून दिली. तसेच अग्रवाल डॉक्टर झाल्यापासून त्यांनी त्यांचे जीवन आरोग्यसेवा देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी समर्पित केले होते. त्यांना २०१० साली पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

कुटुंबीयांनी ट्विटरवरून दिली माहिती...

ABOUT THE AUTHOR

...view details