महाराष्ट्र

maharashtra

DAV School Girl Rape Case: चार वर्षीय मुलीवर अत्याचार, मुख्याध्यापिकेच्या ड्रायव्हरला २० वर्षांची शिक्षा

By

Published : Apr 18, 2023, 3:44 PM IST

हैदराबादमधील गाजलेल्या डीएव्ही शाळेतील मुलीवरील अत्याचार प्रकरणात शाळेतील मुख्याध्यापिकेच्या ड्रायव्हरला न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावणी आहे. अत्याचार झालेल्या मुलीचे वय अवघे चार वर्षे होते.

DAV school principal's driver sentenced to 20 years in prison in 4 yrs old girl rape case
चार वर्षीय मुलीवर अत्याचार, मुख्याध्यापिकेच्या ड्रायव्हरला २० वर्षांची शिक्षा

हैदराबाद (तेलंगणा): राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या बंजारा हिल्स डीएव्ही स्कूलमधील ४ वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी रजनी कुमारला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नामपल्ली फास्ट ट्रॅक कोर्टाने चालक रजनी कुमारला चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवत 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी १७ ऑक्टोबर रोजी बंजारा हिल्स डीएव्ही शाळेत ही घटना घडली होती.

प्रामुख्याध्यापिकेवरही होता गुन्हा दाखल:चार्य माधवी यांचा कार चालक रजनी कुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी रजनीकुमारला अटक केली होती. कार चालकाला वर्गात प्रवेश दिल्याप्रकरणी डीएव्ही शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली. रजनीकुमार यांना २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

नेमकं काय घडलं: बंजारा हिल्समधील डीएव्ही शाळेत पाच वर्षांची मुलगी एलकेजीचं शिक्षण घेत होती. नेहमी हुशार असणारी ही मुलगी गेले काही दिवस शांत शांत होती, म्हणून आईने चौकशी केली. शाळेच्या मुख्याध्यापिकेसाठी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आणि दोन महिन्यांपासून तो तिचा छळ करत असल्याचे तिला समजले. तिने लगेच ही बाब पतीला सांगताच लगेच मित्र आणि नातेवाईकांसह शाळेत गेलेल्या पालकांनी तिथे असलेल्या चालकाला अडवले. माहिती मिळताच बंजारा हिल्स पोलिसांनी तेथे पोहोचून चालक रजनीकुमारसह मुख्याध्यापकाला अटक केली.

पोलिसांनी रजनी कुमारच्या गुन्हेगारी इतिहासाबाबत तपशील गोळा केला. आरोपीने अन्य काही विद्यार्थिनींसोबतही गैरवर्तन केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. 11 वर्षांपासून शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांचा ड्रायव्हर म्हणून काम करणारा रजनी कुमार इतर शिक्षकांशी गैरवर्तन करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तो मुख्याध्यापकांसोबतचा व्यक्ती असल्याने शिक्षकांनीही त्याला पाहिलेच नाही, असे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत शिक्षणमंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनी शाळेची मान्यता रद्द केली होती. शाळेची मान्यता रद्द करू नये यासाठी विशेष संनियंत्रण समिती स्थापन करण्यासाठी शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना पालकांमार्फत निवेदन देण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करून या शैक्षणिक वर्षापर्यंत शाळेची मान्यता कायम ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

हेही वाचा: विना हेल्मेट दुचाकीवरून चाललेल्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details