मुंबई :बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख २० हजार ५६५ रुपये इतकी आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ६३७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख २० हजार ५६५ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर