महाराष्ट्र

maharashtra

लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या महिलेचे केले ३१ तुकडे! जोडप्याला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 10:19 PM IST

Odisha Crime News : ओडिशात जोडप्यानं एका महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दोघांनी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे ३१ तुकडे केले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

Odisha crime news
Odisha crime news

नबरंगपूर (ओडिशा) Odisha Crime News :ओडिशाच्यानबरंगपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील मुरुमाडीही जवळील जंगलात आधी एका महिलेची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३१ तुकडे करून ते गाडण्यात आले. या प्रकरणी रविवारी (२६ नोव्हेंबर) एका जोडप्याला अटक करण्यात आली. नबरंगपूर जिल्ह्यातील २१ वर्षीय तिलाबाई असं मृत महिलेचं नाव आहे. तिच्या मृतदेहाचे अवयव शनिवारी जंगलात सापडले होते.

जोडप्याला अटक : एका पोलीस सूत्रानं सांगितलं की, आदिवासी महिलेच्या मृतदेहाचे सुमारे ३१ तुकडे जमिनीखाली गाडण्यात आले होते. या प्रकरणी रायगढ पोलिसांनी आरोपी प्रियकर चंद्रा राऊत आणि त्याची पत्नी शिया राऊत यांना अटक केली आहे. पापदाहांडीचे एसडीपीओ आदित्य सेन यांनी सांगितलं की, प्रेमप्रकरणातून महिलेची हत्या करण्यात आली.

काय आहे प्रकरण : मिळालेल्या माहितीनुसार, तिलाबाईचं चंद्रा राऊत याच्याशी दोन वर्षे जुनं नातं आहे. तिलाबाई त्याच्यावर वारंवार लग्नासाठी दबाव टाकत होती. बुधवारी रात्री तिलाबाई घरी कोणालाही न कळवता प्रियकर चंद्रा राऊत याच्या घरी पोहोचली. तिनं पुन्हा लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर आरोपी चंद्रा राऊत यानं पत्नीच्या मदतीनं तिलाबाईची हत्या केली. या दोघांनी मृतदेह घरापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या जंगलात नेला आणि त्याचे ३१ तुकडे करून जमिनीत पुरला.

पुढील तपास सुरू : पोलिसांनी मृतदेह कापण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून अंडरट्रायल कैदी म्हणून कारागृहात पाठवलं. पापदाहांडीचे एसडीपीओ आदित्य सेन यांनी सांगितलं की, या प्रकरणी जोडप्याला अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! आधी पत्नीला जिवंत जाळलं, मग दगडानं ठेचून सासऱ्याची केली हत्या, गोळी झाडून केली आत्महत्या
  2. मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, ऑनलाइन जॉब फसवणूक प्रकरणी दोघांना अटक
  3. पेट क्लिनिकमध्ये श्वानाचा गळफास लागून मृत्यू; दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details