महाराष्ट्र

maharashtra

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, मालवाहू जहाजातून तब्बल २०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त!

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 8:48 PM IST

Cocaine Seized : ओडिशातील पारादीप बंदरावर एका जहाजातून २०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. एमव्ही डेबी नावाच्या या मालवाहू जहाजानं इजिप्तमधून प्रवास सुरू केला आणि इंडोनेशियाच्या ग्रेसिक बंदरातून येथं पोहोचलं.

Cocaine Seized
Cocaine Seized

पारादीप (ओडिशा) Cocaine Seized :पारादीप पोलिस, सीआयएसएफ आणि सीमा शुल्क विभागानं गुरुवारी (३० नोव्हेंबर) रात्री उशिरा पारादीप बंदरावर एमव्ही डेबी या मालवाहू जहाजातून कोकेनची २२ पॅकेट जप्त केली. या कोकनची किंमत तब्बल २०० कोटी रुपये आहे.

जहाजातून अवैध ड्रग्जची तस्करी : जप्तीनंतर शुक्रवारी सकाळी पावडर चाचणीसाठी पाठवण्यात आली होती. चाचणीच्या परिणामानंतर असं दिसून आलं की, केकसारखी दिसणारी पावडर प्रत्यक्षात कोकेन आहे. या जहाजातून अवैध ड्रग्जची तस्करी होत असल्याचा संशय आहे. वृत्तानुसार, हे जहाज इंडोनेशियातील ग्रेसिक बंदरातून पारादीप येथे पोहोचलं. ते ओडिशातून स्टील प्लेट्स घेऊन डेन्मार्कला रवाना होणार होतं.

पाकिटांमध्ये दडवलेला पदार्थ ड्रग्ज : एका क्रेन ऑपरेटरनं जहाजात काही संशयास्पद पॅकेट्स पाहिले आणि अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर श्वान पथक आलं आणि त्यांनी पॅकेट जप्त केले. प्रथमदर्शनी ही पाकिटं एखाद्या स्फोटक उपकरणासारखी दिसत होती. मात्र त्यांना स्कॅन केलं असता छोट्या आयताकृती पाकिटांमध्ये दडवलेला पदार्थ ड्रग्ज असल्याचं उघड झालं.

जहाज डेन्मार्कला रवाना होणार होतं : अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एमव्ही डेबी नावाच्या मालवाहू जहाजानं इजिप्तमधून प्रवास सुरू केला आणि इंडोनेशियाच्या ग्रेसिक बंदरमार्गे येथे पोहोचलं. येथून स्टील प्लेट्ससह हे जहाज डेन्मार्कला रवाना होणार होतं. राज्य सीमाशुल्क आयुक्त माधब चंद्र मिश्रा म्हणाले की, 'जहाजावरील क्रेनमधून २२ पाकिटं सापडली आहेत. विशेष किटद्वारे चाचणी केल्यानंतर ते कोकेन असल्याची खात्री झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत २०० कोटी ते २२० कोटी रुपये इतकी आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime : एनसीबीची मोठी कारवाई! मुंबईच्या हॉटेलमधून 15 कोटींचे ड्रग्स जप्त, 2 विदेशी नागरिकांना अटक
  2. Mumbai Crime News : मुंबईत अमली पदार्थाची तस्करी; 505 ग्रॅम चरससह यूपी बिहारमधून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
  3. Raid On Drug Factory : सोलापूरच्या ड्रग्ज कारखान्यातून नाशिकला व्हायचा ड्रग्ज पुरवठा; लाखो रुपयांचा माल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details