महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा निवडणुकीच्या 15 महिने अगोदर विजय रुपाणी यांची गच्छंती कशामुळे?

By

Published : Sep 11, 2021, 9:01 PM IST

Updated : Sep 11, 2021, 10:20 PM IST

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने अचानक का राजीनामा घेतला? भाजपकडून गुजरातमध्ये कोणते प्रयोग सुरू आहेत? सविस्तर वाचा.

विजय रुपाणी

हैदराबाद -गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे.

विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता. सुत्राच्या माहितीनुसार 2021 मध्ये भाजपच्या प्रदेश नेत्यांनी रुपाणी यांच्याविरोधात पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल दिला होता. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात सरकार कमकुवत झाल्याचे अहवालात म्हटले होते. गुजरातच्या राजकारणात रुपाणींच्या राजीनाम्यांची खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती.

विजय रुपाणी

जैन समुदायातून आलेले विजय रुपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 मध्ये म्यानमारमध्ये झाला होता. 1960 मध्ये त्यांचे वडील भारतात परतले होते. 65 वर्षीय विजय रुपाणी यांनी 1971 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. आपत्कालीन काळात त्यांना तुरुंगावसही भोगला. 90 च्या दशकात रुपाणी हे भाजपशी जोडले. निवडणूक जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाची त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली.

हेही वाचा-परमबीर सिंग प्रकरण : दिल्ली उच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस; 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश

अशी आहे रुपाणी यांची राजकीय कारकीर्द

रुपाणी यांनी 2007 ते 2012 पर्यंत सौराष्ट्रची विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सांभाळली. त्यांच्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर पक्षात त्यांचे वजन वाढत गेले. नरेंद्र मोदी आणि आनंदी बेन पटेल यांचे सरकार असताना विजय रुपाणी यांना मंत्रिपद मिळाले. 2016 मध्ये आरक्षणासाठी पाटीदार समाजाने मोठे आंदोलन केले. त्यामुळे आनंदी बेन सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा भाजपने रुपाणी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. विजय रुपाणी हे 7 ऑगस्ट 2016 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात भाजपने 2017 ची निवडणूक लढविली. भाजपला निवडणुकीत बहुमत मिळाले नाही. रस्सीखेच करत भाजपने 182 जागांपैकी 99 जागांवर विजय मिळविला. 26 डिसेंबर 2017 ला विजय रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केलेल्या मोजक्या मुख्यमंत्र्यांमध्ये विजय रुपाणी यांचा समावेश होतो. मात्र, त्यांचा दुसऱ्या टप्प्यातील कार्यकाळ पूर्ण झाला नाही.

शपथविधी सोहळ्यात विजय रुपाणी

हेही वाचा-स्वातंत्र्याची 75 वर्षे : 'जालियनवाला बाग'प्रमाणेच दक्षिणेतही घडले होते क्रूर हत्याकांड.. वाचा, वॅगन हत्याकांड..

भाजपचा नवीन प्रयोग आहे का?

भाजपकडून विविध राज्यांचे मुख्यमंत्रीपद बदलण्याचे प्रयोग सुरू आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्याजागी पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा यांच्याजागी मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे केशुभाई पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी मुख्यमंत्री झाले होते. नरेंद्र मोदी यांनी संघटना आणि सरकारवर नियंत्रण ठेवले होते.

हेही वाचा-कोरोनाच्या फटक्यातून देशाची अर्थव्यवस्था सावरली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुजरात भाजपमध्ये वाढली गटबाजी-

गुजरातमधील भाजपचे नेतृत्व कोण करेल हे भाजपचे राष्ट्रीय नेते निश्चित करतात. तसेच गुजरातमध्ये भाजपची सत्ता टिकविण्यासाठी योगदान देणारे स्थानिक नेतेही प्रभावी आहे. त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे यापूर्वीही दिसून आले होते. 1995 मध्ये केशुभाई पटेल यांच्या काळात शंकर सिंह बघेला यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर पटेल यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर करण्यात आले होते. नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री झाल्यापासून गुजरात भाजपमध्ये स्थिरता आली आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हे तीन नावे आली चर्चेत...

गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सुत्राच्या माहितीनुसार एक ते दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाची निवड एक ते दोन दिवसांमध्ये होऊ शकते. सुत्राच्या माहितीनुसार सध्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. तिन्ही नेते पाटीदार समाजातील मोठे नेते आहेत.

वेळेपूर्वी विधानसभा निवडणूक होणार का?

गुजरात भाजपमधील स्थिती नियंत्रणात येण्यासाठी वेळेपूर्वी विधानसभा निवडणूक घेण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदारांमधील असंतोष आणि सरकार विरोधातील असंतोषाची लाट थोपविण्यासाठी मुख्यमंत्री बदलण्यात येत असल्याची चर्चा आहे. 2022 च्या सुरुवातीला 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले तर गुजरातची निवडणूक ही लवकर होऊ शकते.

Last Updated : Sep 11, 2021, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details