महाराष्ट्र

maharashtra

Goa Election 2022 : गोव्यावर भाजपचा दावा, मगोप मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरणार

By

Published : Mar 9, 2022, 9:29 PM IST

गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Goa Election Result 2022 ) येण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच भाजपने आम्हीच सत्ता स्थापन करणार असा दावा केला ( BJP claims Goa ) आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही त्यांच्या बड्या नेत्यांना गोव्यात पाठवून हालचाली वाढवल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे सत्तेची चावी राहील अशी शक्यता असताना त्यांनीही अप्रत्यक्षपणे थेट मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला ( MGP in CM race ) आहे.

गोवा विधानसभा निवडणुक निकाल
गोवा विधानसभा निवडणुक निकाल

पणजी- सध्याच्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर राज्यात काँग्रेस किंवा भाजप दोघांनाही पूर्ण बहुमत मिळणार ( Goa Election Result 2022 ) नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) मदतीने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आता सत्तेच्या चाव्या एमजीपीकडे आहेत. राज्यात सरकार स्थापन करायचे असेल तर भाजप किंवा काँग्रेसने आपल्या पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका एमजीपीचे नेते सुदिन ढवळीकर यांनी घेतली ( MGP in CM race ) आहे. आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दोन्ही पक्षांना दिला आहे. दरम्यान, गोव्यात भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला ( BJP claims Goa ) आहे.

ढवळीकर यांनी चिदंबरम यांची भेट घेतली

एमजीपी नेते सुदिन ढवळीकर यांनी आज काँग्रेस नेते पी चिदंबरम यांची भेट घेऊन एमजीपीच्या पक्षाला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. बैठकीनंतर ढवळीकर म्हणाले की, बैठकीत पुढील वाटचालीबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र त्यांनी ते उघड करण्यास नकार दिला.

आमचे दरवाजे उघडे आहेत

ढवळीकर सुदिन ढवळीकर म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन करायचे असेल तर काँग्रेस आणि भाजपसाठी एमजीपीचे दरवाजे खुले आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांनी चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन आम्ही केले आहे.

भाजप सरकार स्थापन करणार - फडणवीस

देवेंद्र फडणवीस आज गोव्यात दाखल झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल ताज विवांता येथे भाजप नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, "जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन करू. आमचा मित्र एमजीपीशी चर्चा सुरू आहे. आपण दोघेही एकत्र येऊन सरकार स्थापन करू."

गोव्यातील रिसॉर्टमध्ये काँग्रेसचे उमेदवार

काँग्रेसने आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोव्यातील बीच रिसॉर्टमध्ये हलवले. आम आदमी पक्षानेही आपले उमेदवार सावध केले आहेत. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश जी. राव म्हणाले की, अनेक वेळा एक्झिट पोलमध्ये योग्य आकड्यांचा अंदाज येत नाही. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल आणि गोवा फॉरवर्ड (पक्ष) सोबत आघाडी करून सरकार स्थापन करेल असा आम्हाला विश्वास आहे.

गोव्यात बडे नेते

काँग्रेसचे ट्रबलशूटर डीके शिवकुमार गोव्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आधीच गोव्यात तैनात आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी टीएमसीने अभिषेक बॅनर्जी, प्रशांत किशोर आणि डेरेक ओब्रायन यांना तैनात केले आहे. देवेंद्र फडणवीसही आज दुपारी गोव्यात पोहोचले.

ABOUT THE AUTHOR

...view details