महाराष्ट्र

maharashtra

भारताचे सुखोई-30 फायटर विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा - वायू दल अधिकारी

By

Published : Aug 15, 2019, 11:54 PM IST

वायू दलाचे अधिकारी मींटी अग्रवाल यांना बालाकोट एअर स्ट्राईक आणि त्यांनतर पाकिस्तानने केलेल्या पलटवारावेळी दाखवलेल्या शौर्याबद्दल 'युद्ध सेवा मेडल' देण्यात आले आहे.

वायू दल अधिकारी मींटी अग्रवाल

नवी दिल्ली- भारताचे सुखोई-30 फायटर विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे वायू दलाच्या अधिकारी मींटी अग्रवाल यांनी म्हटले आहे. बालकोट एअर स्ट्राईकनंतर 26 फेब्रुवारीला पाकिस्तानने आपली एफ-16 फायटर विमाने भारतीय हद्दीत घुसवली होती. यावेळी भारताचे फायटर विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र, मींटी यांनी पाकिस्तानचा हा दावा खोडून काढला आहे.

मींटी अग्रवाल यांनी बालाकोट एअर स्ट्राईक आणि त्यांनतर पाकिस्तानने केलेल्या पलटवारावेळी दाखवलेल्या शौर्याबद्दल 'युद्ध सेवा मेडल' देण्यात आले आहे. 'युद्ध सेवा मेडल' मिळवणाऱ्या मींटी या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. भारताने 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर पलटवार म्हणून 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने आपली फायटर विमाने भारतीय हद्दीत घुसवली होती. यावेळी झालेल्या डॉगफाईटमध्ये मींटी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

विशेष म्हणजे डॉगफाईटवेळी 'वीर चक्र' प्राप्त अभिनंदन यांना मार्गदर्शन करण्याचे काम मिंटी यांनी केले होते. अभिनंदन पाकिस्तान हद्दीत प्रवेश करण्याअगोदरपर्यंत त्यांचा अभिनंदन यांच्याशी संपर्क होता. युद्ध काळात विशेष कामगिरी बजावल्या बद्दल मिंटी यांनी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details