महाराष्ट्र

maharashtra

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड

By

Published : Jun 18, 2020, 7:37 AM IST

या आधी 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 आणि 2011-12 यावर्षांमध्ये भारताकडे सुरक्षा परिषदेचे सदस्यत्त्व होते. पाकिस्तान मात्र भारताच्या निवडीवर नाराज आहे. भारताची संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर निवड झाल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.

un
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड

नवी दिल्ली - भारताची आठव्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली. सर्वसाधारण सभेच्या एकूण 193 सदस्यांपैकी 184 सदस्यांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये भारताच्या बाजूने मतदान केले. भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको, आणि नॉर्वेने सुद्धा ही निवडणूक जिंकली तर कॅनडाला पराजय स्वीकारावा लागला. यामुळे भारत आता 2021 ते 2022 या कालावधीसाठी सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार आहे. भारताला मिळालेले अस्थायी सदस्यत्त्व हे खूप महत्त्वाचं असल्याचे मानले जाते. ज्यामुळे भारत शक्तीशाली देशांकडे वाटचाल करत आहे.

याआधी 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 आणि 2011-12 यावर्षांमध्ये भारताकडे सुरक्षा परिषदेचे सदस्यत्त्व होते. पाकिस्तान मात्र भारताच्या निवडीवर नाराज आहे. भारताची संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर निवड झाल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तरीसुद्धा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरेशी यांनी सांगितले की, भारताची अशाप्रकारची निवड होणे ही काही मोठी बाब नाही. यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र, आमच्यासाठी हा एक चिंतेचा विषय आहे.

15 देशांचा समावेश आहे सुरक्षा परिषदेमध्ये -

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य देश आहेत. ज्यामध्ये 5 हे कायम (स्थायी) सदस्य आहेत तर इतर अस्थायी सदस्य आहेत. पाच सदस्यांमध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रीटन, रशिया यांचा समावेश आहे. यामध्ये भारताचा आता अस्थायी सदस्य म्हणून समावेश झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details