महाराष्ट्र

maharashtra

देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा...

By

Published : Oct 8, 2020, 1:42 AM IST

Updated : Oct 8, 2020, 1:56 AM IST

भारतात कोरोना रुग्णांनी 67 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी देशभरात मागील 24 तासत 72 हजार 49 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 986 जणांचा मृत्यू झाला. भारताचा रिकव्हरी रेट 85.02 टक्क्यावर आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी गुरूवारपासून 'जन आंदोलन' मोहीम राबवणार आहे.

देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा...
देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा...

हैदराबाद -भारतात आतापर्यंत 67 लाख 57 हजार 131 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 4 हजार 555 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहे.

देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा...

दिल्ली - 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के इतक्या क्षमतेने सिनेमा गृहे सुरू करण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी साप्ताहिक मार्केट सुरू करण्याची घोषणा केली आहे. साप्ताहिक मार्केटला सुद्धा हा नियम लागू राहील.

महाराष्ट्र- सरकारने मास्कच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्याकरिता समिती नेमली. त्याचा अहवाल सरकारला प्राप्त झाला. त्यानुसार आता एन-95 मास्क 135 रुपयांऐवजी 19 रूपयांत, तीन पदरी मास्क 16 रुपयांऐवजी 4 रुपयांत आणि दोन पदरी मास्क 10 रुपयांऐवजी 3 रुपयांत मिळणार आहेत.

कर्नाटक - राज्य सरकारने मास्क न वापरणाऱ्यांवरील दंडाची रक्कम वाढवली आहे. त्यानुसार शहरी भागात मास्क न वापरल्यास 250 ते 1 हजार रुपयांपर्यंचा दंड घेण्यात येईल, तर ग्रामीण भागात 100 ते 500 रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल.

हिमाचल प्रदेश - नगर विकास मंत्री सुरेश भारद्वाज बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हिमाचल सरकारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले ते तिसरे मंत्री आणि 68 वे आमदार आहेत.

केरळ - केरळचे ऊर्जामंत्री एम.एम मनी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली. तिरूअनंतपुरमच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Last Updated : Oct 8, 2020, 1:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details