महाराष्ट्र

maharashtra

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ लाखांवर; एकूण चाचण्यांनी ओलांडला सहा कोटींचा टप्पा...

By

Published : Sep 17, 2020, 10:58 AM IST

काल दिवसभरात एकूण 1,132 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 83 हजार 198 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 51 लाख 18 हजार 254 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 10 लाख 9 हजार 976 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

COVID-19 LIVE: Record 97,894 infections pushes India's COVID-19 tally to over 51 lakh
देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ लाखांवर; एकूण चाचण्यांनी ओलांडला सहा कोटींचा टप्पा...

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 97 हजार 894 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 51 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,132 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 83 हजार 198 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 51 लाख 18 हजार 254 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 10 लाख 9 हजार 976 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

कोरोना चाचण्यांनी ओलांडला सहा कोटींचा टप्पा..

दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 36 हजार 613 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 5 लाख, 65 हजार 728 एवढी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details