महाराष्ट्र

maharashtra

Aaron Finch Announces Retirement : अ‍ॅरॉन फिंचने केली निवृत्तीची घोषणा, 'या' दिवशी खेळणार शेवटचा सामना

By

Published : Sep 10, 2022, 12:35 PM IST

ऑस्ट्रेलियन संघाचा 50 षटकांचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर ( Aaron Finch Announces Retirement ) केली आहे. 11 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो शेवटच्या वेळी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Aaron Finch
अ‍ॅरॉन फिंच

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अ‍ॅरॉन फिंचने ( Captain Aaron Finch ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर ( Aaron Finch Announces Retirement ) केली आहे. मात्र, तो सर्व आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्त होणार की केवळ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचा 24वा पुरुष संघाचा एकदिवसीय कर्णधार रविवारी केर्न्समध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपला 146वा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार हे निश्चित आहे. अ‍ॅरॉन फिंचच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत खेळलेल्या 145 सामन्यांमध्ये या खेळाडूने 39.14 च्या सरासरीने 5401 धावा केल्या आहेत.

फिंचच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 17 शतके ( Aaron Finch 17 centuries in ODIs ) आहेत आणि तो ऑस्ट्रेलियासाठी रिकी पाँटिंग, मार्क वॉ आणि डेव्हिड वॉर्नरनंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पाँटिंगने या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 29 वेळा 100 धावांचा टप्पा पार केला आहे, तर डेव्हिड वॉर्नर आणि मार्क वॉ 18-18 शतकांसह फिंचपेक्षा पुढे आहेत. फिंचने 2023 एकदिवसीय विश्वचषक हे त्याचे अंतिम लक्ष्य असल्याचे सांगितले होते, परंतु त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला याआधीच या फॉर्मेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.

शनिवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात फिंचने ( Statement by Aaron Finch ) म्हटले आहे की, नवीन कर्णधाराला पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करण्याची आणि जिंकण्याची सर्वोत्तम संधी देण्याची वेळ आली आहे. 2013 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या फिंचने सांगितले की, काही अविश्वसनीय आठवणींसह हा एक अद्भुत प्रवास होता. तो म्हणाला की काही महान एकदिवसीय संघांचा भाग बनण्याची संधी मिळाली, हे मी खूप भाग्यवान समजतो. त्याचप्रमाणे, मी ज्यांच्यासोबत खेळलो त्या प्रत्येकाचा मला आशीर्वाद मिळाला आहे आणि अनेक लोक पडद्यामागे आहेत. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला मदत केली आणि पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा करू शकते. ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स हे त्याचे प्रबळ दावेदार आहेत.

हेही वाचा -Virat Kohli Interview : रोहित शर्माने घेतली विराट कोहलीची मुलाखत,पाहा बीसीसीआयने शेअर केलेसा मजेशीर व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details