महाराष्ट्र

maharashtra

Achievements75 जगात डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा ४० टक्के

By

Published : Aug 11, 2022, 8:52 PM IST

जगातील डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा ४० टक्के ( India's share in digital payments is 40 percent ) आहे. देश या बाबतीत आघाडीवर आहे. गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रात ( International Financial Services Sector ) आपले स्थान मजबूत करत आहे. भारत आता अमेरिका, यूके, सिंगापूरसारख्या देशांच्या निवडक यादीत सामील झाला आहे. जे जागतिक आर्थिक क्षेत्रातील नवीन ट्रेंडला ( New trends in financial sector ) आकार देत आहेत.

digital payments i
digital payments

मुंबई -भारत आता अमेरिका, यूके, सिंगापूरसारख्या देशांच्या निवडक यादीत सामील झाला आहे. जे जागतिक आर्थिक क्षेत्रातील नवीन ट्रेंडला ( New trends in financial sector ) आकार देत आहेत. स्वातंत्र्यानंतर, आत्मविश्वासाच्या अभावामुळे भारताने स्वत:ला आपल्या सीमेत बंदिस्त केले होते परंतू, आता परिस्थिती बदलत आहे. देश जागतिक बाजारपेठांशी अधिकाधिक एकरूप होत आहे. भारत ही जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक ( India leading economies in world ) अर्थव्यावस्था आहे. भारत वर्तमान, भविष्यात या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावू शकतो. भारत आज अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर सारख्या देशांसोबत उभा आहे, जे जागतिक आर्थिक क्षेत्रातील नवीन ट्रेंडला आकार देत आहेत. भारत ही जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. ती पुढे जाऊन आणखी मोठी होईल.

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा ४० टक्के -जगातील डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा ४० टक्के ( India's share in digital payments is 40 percent ) आहे. देश या बाबतीत आघाडीवर आहे. गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करत आहे. प्राचीन व्यापार व्यवस्था आणि संबंध किती व्यापक होते. हे भारताच्या प्राचिन अर्थव्यावस्थेवरुन लक्षात येते. पण, स्वातंत्र्यानंतर आपणच आपला वारसा, आपली ही ताकद ओळखण्यास टाळाटाळ करू लागलो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यू इंडिया ही संक्लपना जोमाने पुढे येते आहे. आज भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे भविष्यात आपली अर्थव्यवस्था आजच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होईल, त्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल.

भारत सोन्या-चांदीची मोठी बाजारपेठ -भारतातील लोकांचे सोन्यावरील प्रेम कोणापासून लपलेले नाही. आज भारत सोन्या-चांदीची मोठी बाजारपेठ ( India Gold and silver market ) बनण्याचे हे एक मोठे कारण आहे. ती फक्त भारताचीच ओळख असावी का? बाजारपेठेचा निर्माता म्हणूनही भारताची ओळख व्हायला हवी. IIBX हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतात एफडीआय विक्रमी पातळीवर येत आहे. या गुंतवणुकीमुळे देशात नवीन संधी निर्माण होत आहेत. तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे हा देशासमोर मोठा प्रश्न आहे. भारतात गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. त्यातून रोजागाराच्या संधी तरूणांना उपलब्ध होणार आहेत.

आर्थिक तंत्रज्ञानात भारत पुढे -आज, झटपट डिजिटल पेमेंटमध्ये जगातील 40 टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. आर्थिक तंत्रज्ञान (FinTech ) क्षेत्रातील भारताची ताकद संपूर्ण जगाला आकर्षित करत आहे. तुम्ही सर्वांकडून FinTech मधील नवीन नवकल्पनांना प्रोत्साहन द्यावे जणेकरू देशाचा विकासाला चालना मिळेल. आज भारतात एक मोठा वर्ग आहे जो विकासासाठी गुंतवणूक करू इच्छितो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडानुसार, 2014 मध्ये भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सुमारे 10 लाख कोटी होती, जी जून 2022 पर्यंत वाढून 35 लाख कोटी झाली. म्हणजेच लोकांना गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी ते तयार आहेत. आम्ही त्यांच्यासाठी शिक्षण माहिती सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तरच देशाचे भविष्य उज्वल होऊ शकते.

हेही वाचा -IT Raid In Jalna राहुल अंजलीच्या लग्नाचे बनले वऱ्हाडी, जालन्यात आयकरकडून 390 कोटींचे घबाड जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details