महाराष्ट्र

maharashtra

Goa elections : अभिषेक बनर्जी, प्रशांत किशोर, डेरेक ओ ब्रायन गोव्यात दाखल

By

Published : Mar 9, 2022, 10:53 PM IST

मतमोजणीला काही तास उरले असताना गोव्यात राजकारण (Politics is in Goa) चांगलेच तापले आहे भाजपाने आकडे जुळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वच पक्षाचे दिग्गज नेते गोव्यात दाखल झाले आहेत. अभिषेक बनर्जी, प्रशांत किशोर, डेरेक ओ ब्रायन, पी चिदंबरम (Abhishek Banerjee, Prashant Kishor, Derek O'Brien in Goa) गोव्यात दाखल झाले आहेत.

Goa elections
गोवा निवडणुक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासात जाहीर होत आहेत, यात सत्तेसाठी सगळेच दावा करत सरसावले आहेत. तृणमूल काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. टीएमसीने विजयी उमेदवारांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोव्यात खास लोक तैनात केले आहेत. तृणमूल काँग्रेसने पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि खासदार डेरेक ओ ब्रायन गोव्यात दाखल ((Abhishek Banerjee, Prashant Kishor, Derek O'Brien in Goa)) झाले आहेत. त्यामुळे त्यांना आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींवर बारीक नजर ठेवता येईल. गोव्यातून टीएमसीच्या आशा खूप वाढल्या आहेत कारण एक्झिट पोलनुसार टीएमसी आघाडी गोव्यात काही जागा जिंकण्याची शक्यता आहे.

भाजपला धाकधूक, काँग्रेस रिलॅक्स मुडमध्ये
कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रमुख नेते डी के शिवकुमार (Congress leader DK Sivakumar) यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आलीआहे. काँग्रेसने सर्वच उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. मात्र असे असले तरी मध्यंतरीच्या काळात मायकल लोबो हे गृहमंत्री अमित शाह यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. मात्र अखेर पत्रकार परिषद घेऊन मायकल लोबोंना या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट करावे लागले होते. भाजप अफवा पसरवण्यात माहीर असून सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपकडून विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप लोबोंनी केला होता. दरम्यान भाजप काँग्रेसच्या उमेदवारांना फोडण्याचा प्रयत्न करु शकते. मात्र काँग्रेसचा एकही उमेदवार भाजपसोबत जाणार नाही असा विश्वास गोवा (Goa) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला आहे. भाजपमध्ये मात्र काही नेते आहेत जे सत्तेसाठी हपापलेले आहेत, जे आम्ही सरकार स्थापन केल्यास आमच्यात येतील असेही चोडणकर म्हणाले होते . मात्र काहीही झाले तरी आम्ही गोव्याच्या जनतेने दाखवलेला विश्वास तोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details