महाराष्ट्र

maharashtra

Jeevanjot Kaur : नवज्योत सिंग सिद्धूसह विक्रम मजिठियांचा पराभव करणाऱ्या कोण आहेत जीवनज्योत कौर?

By

Published : Mar 10, 2022, 4:38 PM IST

पूर्व अमृतसर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू व अकाली दलाचे उमेदवार विक्र मजिठिया यांच्यात अटीतटीची लढ असल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात आपच्या उमेदावर जीवनज्योत कौर यांनी दोघाही नेत्यांना मोठ्या मताने पराभूत केले आहे. पंजाबच्या निवडणुकीत राजकारणातील बड्या मंडळींना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जीवनज्योत कौर
जीवनज्योत कौर

चंदीगड- पंजाब निवडणुकीत आपचा विजय निश्चित आहे. पंजाबमधील जनतेने पंजाबचे राजकारण बदलून टाकले आहे. आम आदमी पार्टी मोठ्या आघाडीसह विजयाकडे वाटचाल करत असताना, पंजाबमधील बड्या राजकीय नेत्यांचा पराभव झाला आहे. पंजाबची सर्वात लोकप्रिय जागा अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघ ( Amritsar East Assembly constituency ) आहे. अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपच्या उमेदवार जीवनज्योत कौर यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला आहे.

पूर्व अमृतसर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू व अकाली दलाचे उमेदवार विक्रम मजिठिया यांच्यात अटीतटीची लढ असल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात आपच्या उमेदावर जीवनज्योत कौर यांनी दोघाही नेत्यांना मोठ्या मताने पराभूत केले आहे. पंजाबच्या निवडणुकीत राजकारणातील बड्या मंडळींना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा-Punjab Election 2022 Result : पंजाबमधील जनतेने प्रस्थापित नेत्यांना नाकारले, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह प्रकाश सिंग बादल पराभूत

पूर्व अमृतसरमध्ये 2017 मध्ये नवज्योत सिंग सिद्धूंना मिळाला होता विजय

आपचे उमेदवार जीवनजोत 6,613 मतांच्या आघाडीने विजयी झाले आहेत. अमृतसर पूर्व 2017 मध्ये 64.94 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू (नवज्योत) सिंह सिद्धू आमदार म्हणून निवडून आले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांनी तत्कालीन एसएडी-भाजप युतीचे राजेश कुमार हनी यांचा पराभव केला होता. तिसर्‍या क्रमांकावर आम आदमी पार्टीचे सरबज्योतसिंग धंजल होते. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार नवज्योतसिंग सिद्धू यांना ६०४७७ मते मिळाली होती. तर एसएडी-भाजपचे उमेदवार राजेश कुमार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 17688 मते पडली.

हेही वाचा-Punjab Assembly election 2022 Results : आपची 92 जागांवर आघाडी, काँग्रेसला केवळ 18 जागांवर आघाडी

कोण आहेत जीवनज्योत कौर?

आदमी पार्टीच्या जीवन ज्योत कौर यांना अमृतसरमध्ये पॅड वुमन म्हणून ओळखले जाते. त्या पंजाबमधील तुरुंगातील महिला कैद्यांना सॅनिटरी नॅपकिन पुरवितात. तसेच गरिब लोकांच्या सेवेसाठी एनजीओदेखील चालवितात.

ABOUT THE AUTHOR

...view details