चिपळूणमध्ये राणे समर्थक आणि शिवसेना उबाठा गटात तुफान राडा; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 8:52 PM IST

thumbnail

रत्नागिरी Rane Supporters VS Thackeray Group  : चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. तसंच दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेकदेखील करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज (16 फेब्रुवारी) निलेश राणे यांची सभा आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच हा राडा झाला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसंच यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालं.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.