एमपीएससी परीक्षेत पूजा वंजारी मुलींमध्ये राज्यात प्रथम, निकाल पाहून डोळ्यात आनंदाश्रू

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 6:56 AM IST

thumbnail

पुणे MPSC Exam Result : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (MPSC) निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसंच पूजा अरुण वंजारी यांनी 570.25 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली पूजा वंजारी मूळची सांगली जिल्ह्यातील वाघा तालुक्यातील बोरगाव गावची आहे. तिचं प्राथमिक शिक्षण बोरगावात झालंय. तिचे वडील शेतकरी आहेत. 2014 मध्ये पूजा इंजिनीअरिंग करत असताना तिनं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली होती. जेव्हा मी निकाल पाहिला तेव्हा, मला खूप आनंद झाला. माझं स्वप्न पूर्ण झालं, असं पूजा वंजारी यांनी म्हटलंय. माझ्या यशात माझ्या कुटुंबाचा, माझ्या सासरच्या मंडळींचा वाटा आहे. मी रोज जवळपास 8 तास अभ्यास करायचे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावं, असा मोलाचा सल्ला पूजा वंजारी यांनी विद्यार्थ्यांना दिलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.