रणजीत सावरकरांनी महात्मा गांधींच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान का केलं? कुमार सप्तर्षींनी सांगितलं 'हे' कारण

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 8:49 AM IST

thumbnail

पुणे : नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीनं राष्ट्रपिता महात्मा गांधीजीं यांची हत्या झाली नाही, असं नुकतेच रणजीत सावरकर यांनी केला दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर विविध नेते मंडळींकडून प्रतिक्रिया येत आहेत. सावरकर यांच्या या दाव्यावर गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्यांनी जे काही पुस्तकात म्हटलं आहे, ते नवीन नाही. शाखेत पूर्वीपासूनच सांगितल जातं.  हे त्यांच्या अंगलट येणार आहे. जर नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांना मारलं नाही तर, मग गोडसे याला हे का मानतात? त्याच्याकडे दुसरे सद्गुणअसल्यानं  संघाचे लोक त्याला मानतात का? असा थेट प्रश्नच सप्तर्षी यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अस वक्तव्य जाणीवपूर्वक केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जगात कुठेही गेल्यावर गांधीच्या स्मारकाच्या समोर त्यांना नतमस्तक व्हावं लागतं. त्यामुळे ते असे वक्तव्य करत असतात, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.