मुंबईतील गोरेगाव परिसरात अनमोल प्राईड इमारतीला आग, जीवित हानी नाही

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 9:15 PM IST

Updated : Jan 24, 2024, 9:58 PM IST

thumbnail

मुंबई Fire at Anmol Pride building : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील अनमोल प्राइड इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेल्या इमारतीत काही कुटुंबे अडकल्याची माहिती आहे. गोरेगाव पश्चिमच्या महेश नगरमधील गोविंदजी श्रॉफ मार्गावरील अनमोल प्राइडमध्ये संध्याकाळी 6.40 ला आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार आग 25 व्या मजल्यावरील बंद पेंट हाऊसमध्ये लागली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनमोल प्राइड इमारतीत काही कुटुंबे अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचं पथक उपस्थित आहे. अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली आहे.

Last Updated : Jan 24, 2024, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.