ETV Bharat / state

भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू; गोरेगाव फिल्म सिटीमधील घटना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 6:47 AM IST

Updated : Feb 25, 2024, 7:42 AM IST

Goregaon Wall Collapsed : मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीत (Goregaon Film City) शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडलीय. येथे भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झालाय, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय.

Mumbai wall collapsed
भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

मुंबई Goregaon Wall Collapsed : मुंबईच्या प्रसिद्ध अशा गोरेगाव फिल्म सिटीत (Goregaon Film City) भिंत कोसळल्यामुळं (Wall Collapsed) दोन मजुरांचा मृत्यू (Two laborers Died) झालाय. तसेच या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरील घटना नेमकी कशी घडली? याबाबतची अधिकची माहिती समजू शकली नाही.

ढिगाऱ्याखाली अडकले तीन मजुर : मुंबईतील गोरेगाव परिसरात प्राइम फॉक्स प्रॉडक्शनच्या पाठीमागे फिल्म सिटी गेट नंबर २ जवळ, ६० फूट लांब तर २० फूट उंच भिंत कोसळल्यानं ढिगाऱ्याखाली तीन मजुर अडकले होते. यातील दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधित घटना कशी घडली याचा तपास सुरूय.

दुर्घटनेतील मृतांची नावे : मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झालाय. संतू मंडल आणि जयदेव मंडल अशी मृतांची नावे आहेत. तर विक्रम मंडल हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव फिल्म सिटीत मोठमोठे चित्रपट, टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरू असतं. तिथे अशाप्रकारे भिंत कोसळण्याची घटना घडल्यामुळं कला विश्वात खळबळ उडाली आहे.

मदतीची कुटुंबियांची मागणी : ही घटना कशामुळं घडली याचा सध्या तपास सुरू आहे. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे. हे सर्व कामगार याठिकाणी काम करत होते. त्यातच ही दुर्घटना घडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

हेही वाचा -

  1. Well Collapsed : बैलाला बाहेर काढताना विहीर ढासळून 5 जणांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
  2. Mathura House Wall Collapse: मंदिराजवळील इमारतीची भिंत कोसळल्याने 5 भाविकांचा मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
  3. Wall Collapse In Kolhapur : खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
Last Updated :Feb 25, 2024, 7:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.