ETV Bharat / bharat

Well Collapsed : बैलाला बाहेर काढताना विहीर ढासळून 5 जणांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

author img

By

Published : Aug 17, 2023, 10:22 PM IST

Well Collapsed
Well Collapsed

गावातील विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढताना विहीर ढासळून पाच जणांचा मृत्यू (Five people died due to well collapse) झाल्याची घटना झारखंडमधील मुरी ओपी परिसरातील पिस्का गावात घडली आहे. बैलाला बाहेर काढण्यासाठी 4 जण विहिरीत उतरले होते. उर्वरित गावकरी दोरीच्या मदतीने बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्याचवेळी अचानक विहिरीची माती खचल्याने सर्वजण मातीत दबले. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

रांची(झारखंड) : रांचीपासून 70 किमी अंतरावर असलेल्या सिल्लीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुरी ओपी परिसरातील पिस्का गावात विहीर ढासळल्याने सातजण ढिगाऱ्याखाली दबले होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत एक बैल पडला होता. बैलाची सुटका करण्यासाठी चार जण विहिरीत उतरले होते.

सात जण मातीखाली दबले : बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. विहिरीच्या आजूबाजूची माती अचानक खचल्याने सात जण मातीखाली दबले होते. दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक आमदार, AJSU प्रमुख सुदेश महतो देखील पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या पाच मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात येत आहेत.

घटनेत पाच जणांचा मृत्यू : सिल्ली पोलिस स्टेशनचे प्रभारी आकाश दीप यांनी सांगितले की, बैल काढताना सात जण मातीत दबले होते. त्यापैकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते सर्व जण चाळीस फूट खाली मातीत दबल्याने बचावकार्यात अडचण येत आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मशीन मागवण्यात आली आहे.

एनडीआरएफचे पथक घटनास्थळी : रांची शहराचे एसपी शुंभशु जैन यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, ही घटना सिल्लीजवळील मुरी येथे घडली आहे. या ठिकाणी सात ते आठ लोक मातीत दबल्याची माहिती मिळाली होती. याबाबतची माहिती एनडीआरएफच्या टीमला देण्यात आली होती. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी बचावकार्य सुरू केले होते. 'ETV भारत'च्या टीमने सिल्ली विधानसभा मतदारसंघातील आमदार सुदेश महतो यांच्याशी फोनवर संपर्क साधत माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, मला घटनेची माहिती मिळाली आहे. मी घटनास्थळी जात आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतरच परिस्थिती लक्षात येईल.

हेही वाचा : Sana Khan Missing case: भाजपा नेत्या सना खान बेपत्ता होण्याचे गूढ कायम, गेला कुठे मृतदेह?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.