ETV Bharat / state

भरधाव टिप्परनं अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडलं, हिंगणाच्या वानाडोंगरी येथील घटना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 10:42 PM IST

Nagpur Accident News: महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमात मित्र-मैत्रिणींसोबत आनंदी क्षण साजरे केल्यानंतर, कॉलेजमधून घरी परतत असताना काळाने घाला घातला आणि त्यात २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सरोदी मोहल्ला येथे घडली. या अपघातामुळे हिंगणा- बर्डी मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती.

Nagpur Accident
२१ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीचं मृत्यू

नागपूर Nagpur Accident News : भरधाव टिप्परनं मागून दुचाकीला धडक (Nagpur Road Accident) दिली. या अपघातात २१ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालाय. रितीका रामचंद्र निनावे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती आज हिंगणाच्या वाय.सी.सी अभियांत्रिकी (YCC Engineering College Nagpur) कॉलेजची विद्यार्थिनी होती. टिप्परनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर तिचा तोल जाऊन ती खाली पडली असता, टिप्परचा मागील चाक तिच्या अंगावरून गेल्यानं तिचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.

घटनास्थळी झाला मृत्यू : रितीका रामचंद्र निनावे ही वायसीसी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स या शाखेत चौथा वर्षात शिकत होती. आज कॉलेजमध्ये आयोजित स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून ती घरी जाण्यासाठी निघाली होती. मित्र नयन वाढवी नामक मित्राच्या बुलेट गाडीवरून नागपूरकडं जात असताना राजीव नगरच्या सरोदी मोहल्ला समोर हिंगणा येथून भरधाव टिप्परनं दुचाकीला जबर धडक दिली. अपघातात रितीका निनावे ही मागील चाकाखाली आली त्यामुळं तिचा जागेवरच मृत्यू झाला.



टिप्पर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल : या अपघातानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळं तासभर हिंगणा-बर्डी या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात सहा जणांचा मृत्यू : या आधीही अशीच एक घटना घडली होती. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये 16 डिसेंबरच्या रात्री भीषण अपघात झाला होता. कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता. काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली होती.

हेही वाचा -

  1. Car Container Accident: देवदर्शन करून परत येताना कारची उभ्या ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू तर सात जखमी
  2. Nagpur Accident : नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
  3. Nagpur Accident : हृदयद्रावक, नागपूरात भरघाव कारची ट्रकला धडक; सात जणांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.