ETV Bharat / state

Indapur Crime News: जेवायला हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या, गँगवॉरची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 11:24 AM IST

Indapur Crime News: जेवायला हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या, इंदापुरात खळबळ
Indapur Crime News: जेवायला हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या, इंदापुरात खळबळ

Indapur Crime News : इंदापुरमधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. एका हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.

इंदापूर (पुणे) Indapur Crime News : जेवण करण्यास हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना पुण्याच्या इंदापूर शहरात घडलीय. अचानक गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. अविनाश धनवे असं मृत तरुणाचं नाव आहे. दोन गटातील पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवलीय.

जेवायला बसताच गोळ्या झाडून हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह इंदापुरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला होता. यावेळी अचानक त्याच्या मागावर असलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वारही केले. यात अविनाशचा जागीच मृत्यू झाला. तसंच यात अविनाशच्या डोक्यातही गोळी लागली. गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नाही. हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. अविनाश हा पुण्यातील आळंदी परिसरातील राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.


सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरु : हल्लेखोरांनी अविनाशवर गोळीबारासोबतच चाकूनं धारदार वार केले. त्यामुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू केलाय.

पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ : गेल्या काही दिवसांपासून शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झालीय. यामुळं पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. तसंच पुण्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळं पुण्याची ओळख आता गुन्हेगारांचं माहेरघर अशी होत आहे का, असा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा :

  1. Wife and daughter killed : धक्कादायक! भांडण गेलं विकोपाला, पुण्यात पतीकडून पत्नी आणि मुलीचा खून
  2. Pune ISIS Terror Module Case : पुणे इसीस मोड्युल प्रकरण ; साताऱ्यात दहशतवाद्यांकडून लूट, घेतलं बॉम्ब बनवण्याचं सामान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.