ETV Bharat / state

Pune ISIS Terror Module Case : पुणे इसीस मोड्युल प्रकरण ; साताऱ्यात दहशतवाद्यांकडून लूट, घेतलं बॉम्ब बनवण्याचं सामान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 12:24 PM IST

Updated : Mar 14, 2024, 5:19 PM IST

Pune ISIS Terror Module Case
संग्रहित छायाचित्र

Pune ISIS Terror Module Case : पुण्यातून पकडलेल्या इसीसच्या दहशतवाद्यांनी साताऱ्यात लूट केल्याचं उघड झालं आहे. साताऱ्यातील एका साडीच्या दुकानदाराला बंदुकीच्या धाकावर या दहशतवाद्यांनी लुटलं. त्याच्याकडून घेतलेल्या एक लाख रुपयातून बॉम्ब बनवण्याचं सामान घेतल्याचंही तपासात पुढं आलं आहे.

पुणे Pune ISIS Terror Module Case : इसीस दहशतवाद मोड्युल प्रकरणी पुण्यातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी, मोहम्मद शाहनवाज आलम आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं होतं. या दहशतवाद्यांचं सातारा कनेक्शन उघड झालं आहे. या दहशतवाद्यांनी साताऱ्यात एक साडीचं दुकान लुटून त्या लुटीच्या रकमेतून बॉम्ब बनवण्याचं सामान खरेदी केल्याचं उघड झालं आहे. दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर ही लूट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या पुणे इसीस दहशतवाद प्रकरणी सातारा कनेक्शन उघड झाल्यानं सुरक्षा यंत्रणा त्या दृष्टीनं तपास करत आहेत.

NIA कडून आरोपपत्र दाखल : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने पुणे ISIS मोड्युल प्रकरणी आणखी चार आरोपींची नावे आणि एकावर आरोप जोडून पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय. यासह जुलै 2023 मध्ये NIA नं एकूण 11 आरोपींवर आरोपपत्र दाखल केलंय.

कोथरुडमधून पकडले होते तीन दहशतवादी : पुण्यातील कोथरुड भागात जुलै 2023 मध्ये तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी, मोहम्मद शाहनवाज आलम आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान या तीन दहशतवाद्यांचा यात समावेश होता. दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी कशा प्रकारे पैसे जमा केले आणि ते पैसे नेमके कोणाकोणाला आणि कशा प्रकारे दिले गेले याबाबतचा तपास सुरू होता.

साताऱ्यात लूट करुन बॉम्ब बनवण्याची घेतलं सामान : इसीस दहशतवाद मोड्युल प्रकरणी अटकेतील दहशतवादी साताऱ्यात तळ ठोकून होते. यात साताऱ्यात शाहनवाज आलम आणि मोहम्मद साकी यांनी दुकानात लूटमार केली होती. या दहशतवाद्यांनी लुटीनंतर चोरी केलेली रोकड ही दहशतवादी कृत्यासाठी वापरली होती. 1 लाख रुपये किमतीची बॉम्ब बनवण्याचं सामान या दहशतवाद्यांनी खरेदी केलं होतं. तयार करण्यात आलेल्या बॉम्बच्या चाचण्या विविध ठिकाणच्या जंगलात आरोपींनी घेतल्याचं आतापर्यंतच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा :

  1. Pune ISIS Module : पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी 'या' हिंदुत्ववादी नेत्याच्या हत्येचा रचला कट; एटीएसच्या तपासात माहिती आली समोर
  2. Pune ISIS Module Case : साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट ; पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती
  3. Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएला मोठं यश, आठव्या आरोपीला अटक
Last Updated :Mar 14, 2024, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.