ETV Bharat / state

साताऱ्यात दहशतवादी असल्याच्या फोनमुळं पोलिसांची उडाली धावपळ, पुढे काय घडलं? वाचा बातमी

Satara Terrorist Threat Call : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनने मुंबईसह साताऱ्यातील पोलिसांची झोप उडवली. साताऱ्यात दहशतवादी असून भयंकर काही तरी घडणार असल्याचं फोन करणाऱ्यांनी सांगितलं. त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला.

Satara Crime News
दहशतवादी फोन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 2:00 PM IST

सातारा Satara Terrorist Threat Call : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनमुळं राज्यातील पोलिसांची काही काळ झोप उडाली. साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडं रडार असल्याची माहिती, फोनवरून मिळाल्यानं मध्यरात्रीपासूनच यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्यांचा शोध लागल्यानंतर तपासात सर्व बाबींचा उलगडा झाला आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

पंतप्रधान पुढील आठवड्यात सातारा दौऱ्यावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवजयंती दिनी (दि. १९ फेब्रुवारी) सातारा दौऱ्यावर येणार आहेत. राजघराण्याच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांना पहिला 'शिवसन्मान' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या दौऱ्याची सध्या तयारी सुरू असतानाच साताऱ्यात दहशतवादी असल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. तसेच काही तरी भयंकर घडणार असल्याचं फोन करणाऱ्यांनी सांगितल्यानं पोलीस अलर्ट झाले आहेत.

मध्यरात्री आलेल्या फोनमुळे खळबळ : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला साताऱ्यात काही दहशतवादी असून, त्यांच्याकडं रडार आहे, असा फोन शुक्रवारी मध्यरात्री आला. खूप मोठे काही तरी घडणार असल्याचं फोनवरुन सांगण्यात आलं. त्यामुळं पोलिस यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली. मुंबई पोलीस मुख्यालयातून तातडीने मुंबई गुन्हे शाखा तसेच सातारा पोलिस आणि रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती देऊन अलर्ट करण्यात आलं.

फोन करणारा निघाला मानसिक रोगी : पोलिसांनी पहिल्यांदा फोन करणाऱ्या व्यक्तीला मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयिताच्या नातेवाइकांशी पोलिसांनी संपर्क साधला. फोन करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून त्याची मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती त्या व्यक्तीच्या जावयाने दिली. तसेच ती व्यक्ती मुंबईमध्ये बहिणीकडे राहत असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं. हा सर्व गुंता सुटल्यानं पोलिसांनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला.

हेही वाचा -

  1. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येतून तीन संशयितांना अटक, खलिस्तानी दहशतवादी 'अर्श डाला'शी संबंध असल्याचा संशय
  2. पाकिस्तानला दणका; सीमा भागातील दहशतवादी तळांवर इराणचा 'सर्जिकल स्ट्राईक'
  3. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याच्या गाडीवर हल्ला; 3 जवान हुतात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.