ETV Bharat / state

महाविकास आघाडी आणि वंचितची बैठक! राऊत म्हणाले, मोदींची हुकूमशाही संपवण्यावर आमचं अन् आंबेडकरांचं एकमत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 8:31 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

Mahavikas Aghadi and Vanchit Meeting : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांत जाहीर होणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागा वाटपातील तिढा सुटायला तयार नाही. आज बुधवार (दि. 6 मार्च) रोजी मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपाबाबतची बैठक झाली. देशातील मोदींची हुकूमशाही उलथवायची यावर प्रकाश आंबेडकर आणि आमचं एकमत झाल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर सांगितलं.

व्हिडिओ

मुंबई : Mahavikas Aghadi and Vanchit Meeting : आज महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली. या बैठकीला वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. तसंच, महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत हे प्रमुख नेतेही उपस्थित होते. तब्बल चार तास ही बैठक चालली. या बैठकीत 48 मतदार संघात कोणत्या जागेवर कोण उमेदवार देण्यात यावा याबाबत सविस्तर सुमारे चार तास चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे संकेत स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.

एकत्रित पत्रकार परिषदेत होणार : प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला किती जागा लढवायच्या आहेत याबाबत प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नसल्याचं ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडीसोबत वंचितने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जायचं ठरलं आहे. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही एका गोष्टीवर पूर्ण समाधानी आहोत की महाराष्ट्रातून आणि देशातून मोदींची हुकूमशाही उलथून टाकण्यावर आमचं आणि आंबेडकरांचं एकमत झाल आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच, लवकरच महाविकास आघाडीतील उमेदवार एकत्रित पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर केले जाईल असंही राऊत म्हणाले आहेत.

पुढील बैठकीत निर्णय होईल : महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली. परंतु, या बैठकीत अंतिम निर्णय झाला नसून, पुढील बैठकीत निर्णय होईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली का? यावर प्रकाश आंबेडकर यांनी 'तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडं पाहून काय वाटतं?' असा उलट प्रश्न करत थेट उत्तर देण टाळलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची नऊ मार्चला पुन्हा बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

1 भाजपाचा 400 पार'चा नारा! मात्र, जागा वाटपाचं सुत्र बिघडलं; अजित पवार गटामुळे पेच प्रसंग

2 अमित शाह यांनी बैठक घेऊनही जागा वाटपाची बैठक निष्फळ? भाजपाच्या लोकसभा उमेदवारांची रखडली यादी

3 माझी जात न बघता पक्षाने मला उमेदवारी दिली; हंसराज अहीर यांचं सूचक वक्तव्य कुणासाठी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.