ETV Bharat / state

पर्यावरण रक्षणासाठी लोकसभा निवडणूक लढणारा कोल्हापूरचा अवलिया संदीप संकपाळ, सायकलवरून येत दाखल केला अर्ज - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 4:03 PM IST

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ (Sandeep Sankpal) यांनी आज (18 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी सायकलवरून येत अर्ज दाखल केला.

Lok Sabha Election 2024 Kolhapur Constituency Independent candidate Sandeep Sankpal filed his nomination form coming on bicycle
अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ

अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ

कोल्हापूर Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी (Kolhapur Constituency) 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झुंबड उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (18 एप्रिल) कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ (Sandeep Sankpal) यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी चक्क सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पर्यावरण रक्षणाचा संदेश : कोल्हापूर शहरातील पंचगंगानदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना कोणत्याही राजकीय नेत्यानं कोल्हापूरच्या प्रदूषणाचा प्रश्न गांभीर्यानं घेतला नाही. त्यामुळं कोल्हापुरातील प्रदूषणाच्या समस्येकडं सर्वांचं लक्ष जावं, या अनुषंगानं अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांनी सायकलवरून प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केला. संदीप संकपाळ यांनी यापूर्वी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अनुक्रमे 10 हजार 963 आणि साडे सहा हजारांचं मतदान मिळवलं होतं. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी सलून व्यावसायिक असलेले 43 वर्षीय संदीप संकपाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात सायकलवरून आले, पर्यावरणाला कोणतंही नुकसान पोहोचू नये यासाठी आपण सायकलनं प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कोल्हापूरकरांनी आपल्या मतांचं दान टाकून मला विजयी करावं असं आवाहनही यावेळी संकपाळ यांनी केलं.


कोण आहेत संदीप संकपाळ : संदीप संकपाळ यांना त्यांच्या गावी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे भावी खासदार म्हणून ओळखलं जातं. 2019 मध्ये स्थापन केलेल्या 'बरंच काही' फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत असतात. ते आपल्या हटके लूकमुळेही ओळखले जातात.

हेही वाचा -

  1. महायुतीचे शक्ती प्रदर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024
  2. लातूर शहर महापालिकेच्या वेबसाईटवर इचलकरंजीच्या मतदारांची यादी, अधिकाऱ्यांवर कारवाईची भाजपाची मागणी - Lok Sabha Election 2024
  3. देशपातळीवर पक्ष फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची टीका - Congress MLA Satej Patil
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.