ETV Bharat / politics

महायुतीचे शक्ती प्रदर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 7:17 PM IST

Lok Sabha Election 2024 : महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Lok Sabha Election 2024
संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन

संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन

कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर हे शक्तिपीठ आहे. हे शक्तिपीठ संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या मागे खंबीरपणं उभं राहील, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केलंय. जेव्हा जेव्हा कोल्हापूरवर संकट आलं तेव्हा आम्ही कोल्हापूरकरांच्या पाठीशी उभे राहिललो. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाची नाही तर देशाची आहे. यासाठीच दोन्ही खासदारांमध्ये आपली ताकद उभी करा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलंय. खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलिक यांच्या शक्ती प्रदर्शनात सामील झालेल्या मुख्यमंत्र्यांनी खानविलकर पेट्रोल पंप परिसरात झालेल्या सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी दोन्ही खासदाराला निवडून देण्याचं आवाहन केलंय.

उमेदवारी अर्ज दाखल : कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान या ठिकाणापासून सुरू झालेली भव्य रॅली गंगावेस, पापाची तिकटी, दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकली. तत्पूर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, प्रकाश आबीटकर, राजेश पाटील हे नेते रॅलीत सहभागी झाले होते. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवा स्कार्फ घालून हजारो कार्यकर्ते, महिला खासदार, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात भव्य पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.


मुख्यमंत्री कोल्हापुरात येताच थेट आवडेंच्या घरी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे निवासस्थानकातून त्यांचं बंड संपवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आवाडे, राहुल आवारे यांच्यासह आव्हाडे कुटुंबीयांशी मुख्यमंत्री चर्चा केली. या चर्चेतून यशस्वी तोडगा काढत मुख्यमंत्र्यांनी आवडेंना घेऊन थेट रॅलीत सहभाग नोंदवल्यामुळं प्रकाश आवाडे यांचं बंड थंडावलं आणि हातकणंगले मधून धैर्यशील मानेंच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर झाला.


मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा : जे 50 60 वर्षात झालं नाही ते पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात करून दाखवलं, कोल्हापूरच्या पंचगंगेच प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाही, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना ही संधी सोडू नका असं मतदारांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है" यंदाची लोकसभा निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे. 7 मेला संजय मंडलिक आणि माने या दोन्ही शिलेदारांना मतदान करून विजयी करा.


हेही वाचा -

संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut

माढा, बारामतीनंतर सोलापूरचा वाद फडणवीस यांच्या दरबारी, तासाभराच्या चर्चेनंतर उत्तम जानकर परतले - Uttam Jankar met Fadnavis

नाशिक आणि कोकणात 'कमळावर बाण' ताणलेलाच, दोन्ही मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने ठोकला दावा - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.