ETV Bharat / state

पुण्यातून अपहरण झालेल्या मुलाची साताऱ्यात सुटका; 70 लाखांच्या खंडणीसाठी केलं होतं अपहरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 7:34 AM IST

Satara Crime News
अपहरण झालेल्या मुलाची साताऱ्यात सुटका

Satara Crime News : पुण्यातून 70 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या बारा वर्षाच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आलीय. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं पुणे पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं. मात्र पोलिसांची चाहूल लागतात अपहरणकर्ते अंधाराचा फायदा घेऊन पसारा झाले आहेत.

सातारा Satara Crime News : पुण्यातील कात्रज भागातून ७० लाखांसाठी अपहरण करण्यात आलेल्या १२ वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पुणे पोलिसांना सातारा पोलिसांच्या मदतीनं यश आलं आहे. सातारा तालुक्यातील पाटेघर येथील डोंगरामध्ये अपहरणकर्ते लपले होते. पोलिसांची चाहूल लागताच मुलाला तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले.


सातारा एलसीबीच्या मदतीने मोहिम फत्ते : पुणे गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकांनी सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि स्टाफच्या मदतीनं पाटेघर डोंगर परीसर पिंजुन काढला. पोलीस आल्याची चाहुल लागल्यानं संशयितांनी अपहरण मुलास डोंगरात सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलंय. फरार आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहे.



कात्रज भागातील भिलारवाडी येथून राजेश सुरेश शेलार या आरोपीने दिनांक १८ फेब्रुवारी रोजी १२ वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं होतं. ७० लाख दिले तर मुलाला सोडण्यात येईल. तसेच पोलिसात तक्रार दिली तर मुलाच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकीही अपहरणकर्त्यानी दिली होती. पीडित मुलाच्या पित्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित मुलाची सुखरूप सुटका केलीय - अरूण देवकर, पोलीस निरीक्षक (सातारा स्थानिक गुन्हे शाखा)


आरोपी लपले साताऱ्यातील पाटेघरच्या डोंगरात : घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे झोन २ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, नंदिनी वग्यानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित मुलाची सुखरूप सुटका करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोपी मुलाला घेऊन पाटेघर (ता. सातारा) येथील डोंगरामध्ये लपले असल्याची माहिती तपास पथकांना मिळाली.


या पथकानं केली कारवाई : पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (झोन परिमंडळ २) स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, गुन्हे शाखा युनिट २, अमोल रसाळ यांच्यासह सातारा स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केलीय.

हेही वाचा -

  1. क्रीडा शिक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटना
  2. 'मला कॅन्सर आहे, माझ्यानंतर माझ्या मुलाचा सांभाळ कोण करेल'; जन्मदात्या पित्याकडून 12 वर्षीय मुलाचा खून
  3. Satara Crime News: तीन राज्यात घरफोड्या करणारी केटीएम गॅंग जेरबंद; गुजरातमध्ये गहाण ठेवलेले १०३ तोळे सोने, ६ किलो चांदी हस्तगत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.