ETV Bharat / state

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना झटका; 'या' ग्रामपंचायतीनं घेतला मोठा निर्णय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 8:31 PM IST

kolhapur news take care of the parents otherwise all facilities provided by Gram Panchayat will be closed
वृद्ध आई-वडिलांना न सांभाळण्याची चूक करताय तर मग ही बातमी तुमच्यासाठी; कोल्हापुरातल्या ग्रामपंचायतीने घेतला 'हा' निर्णय

Kolhapur News : अलीकडच्या काळात काही मुले आणि मुली वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. तसंच, त्यांची संपत्ती घेऊन त्यांना एकटे सोडून देतात. त्यामुळं अशा पाल्यांना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत, असा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या दऱ्याचे वडगाव ग्रामपंचायतीनं काढलाय.

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना झटका; 'या' ग्रामपंचायतीनं घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर Kolhapur News : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे विभक्त कुटुंब पद्धतीत वाढ होत आहे. विशेषतः वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची मानसिकता मुलांमध्ये दिसत नाही, यातूनच घरामध्ये वाद होऊन आई-वडिलांना विभक्त ठेवण्याची किंवा त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलांनी आपल्या वृद्धपकाळात आपल्याला एकटं पाडणं हे आई-वडिलांसाठी क्लेशदायक असतं. मात्र, आता आपल्या आई-वडिलांना वृद्धपकाळात एकटं सोडणाऱ्या मुलांना चांगलीच अद्दल घडवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव ग्रामपंचायतीनं घेतला आहे.

ग्रामपंचायतीच्या सोयी-सुविधा बंद : वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी आणि सुविधा बंद केल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या गावच्या ग्रामसभेत हा ठराव करण्यात आलाय. विशेष म्हणजे या निर्णयासाठी गावातील सत्ताधारी आणि विरोधकांनी एकजूट केली आहे. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणीदेखील केली जाणार आहे. तसंच अशा मुलांना ग्रामपंचायतीकडून केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. शिवाय आवश्यक कागदपत्रंदेखील यापुढं ग्रामपंचायत कार्यालयातून दिली जाणार नाहीत.


गावातील वाद गावातच मिटवण्याचा प्रयत्न : नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत माजी सरपंच शाहू चव्हाण यांनी हा ठराव मांडला. या ठरावाचा विधायक दृष्टिकोन लक्षात घेत सत्ताधारी गटानंदेखील तात्काळ हा ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे गावात आता यापुढे 'एक दिवस न्यायासाठी' ही संकल्पना राबवून गावातील वाद गावातच मिटवण्याचा प्रयत्नदेखील केला जाणार आहे. त्यामुळं दऱ्याचे वडगाव ग्रामपंचायतीनं घेतलेला हा निर्णय गावातील अनेक कुटुंबासाठी दिलासादायक ठरणार आहे. गावातील एखाद्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गट एकमेकांसमोर आल्याची उदाहरणं आपण नेहमीच पाहतो. मात्र, विधायक दृष्टिकोन ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र येत घेतलेला हा निर्णय नक्कीच अनुकरणीय आहे.


एक दिवस न्यायासाठी एक दिवस गावासाठी : अनेक गावांमध्ये पथदर्शी निर्णय घेतल्यानंतर गावात काही वाद उद्भवल्यास याचं निरसन गावातच व्हावं यासाठी एक दिवस गावासाठी अशी संकल्पना राबवणार असल्याचं यावेळी ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलं. गावातील तंटे वादविवाद पोलीस स्टेशनला न जाता ते गावातच मिटावीत यासाठी हा प्रयत्न केला असल्याचं यावेळी गावकऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

  1. Matoshree Vrudhashram Amravati : दिवाळीला कुणीतरी भेटायला या! मुलांनी वृद्धाश्रमात सोडलेल्या माता-पित्यांच्या डोळ्यात अश्रू
  2. ऐंशीहून अधिक मातांचा 'तो' झालाय पुत्र तर 'ती' झाली सुन...
  3. विशेष : वृद्धाश्रमात मृत्य झाल्यावर रक्ताच्या नात्यांनी केले दूर; 'माणुसकी ग्रुप'कडून अंत्यसंस्कार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.