ETV Bharat / state

ऐंशीहून अधिक मातांचा 'तो' झालाय पुत्र तर 'ती' झाली सुन...

author img

By

Published : Jun 6, 2022, 4:26 PM IST

या वृद्धाश्रमात, देशातील अनेंक राज्यातील तब्बल 130 वृद्ध, अपंग अनाथ राहतात. त्यात वयाची साठ ते नव्वद वर्षे पार केलेल्या जवळपास एश्शीच्या वर महिला आहेत. या सर्वांची काळजी श्रीनिवास आणि सुधा घेतात. या आश्रमात सर्व भाषिक माता पिता राहतात. त्यांना पोटच्या मुला-मुलींनी सोडुन दिले आहे. अशा परीस्थीतीने ते बेघर झाले. अशांची काळजी पोटचा मुलगा नसलेला श्रीनीवास आणि सुन सुधा घेतायेत.

shirdi sai bhakt dwarkamai old age home take care 130 orphan
द्वारकामाई वृद्धाश्रम

शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी हे जगभरातील लोकांचे श्रध्दास्थान. साईच्यावर श्रध्दा ठेवुनच श्रीनिवास हे मुळचे विजयवाडा येथील रहिवासी. मात्र, शिर्डी साईबाबांचे परमभक्त असलेला श्रीनीवास आपल्या पत्नी समवेत शिर्डीत आला. त्या आधी त्याने हैदराबाद येथील एका साई मंदिरात साई सेवा केली होती. तेथे अनेक वृद्ध भक्त मंदिरात येत होते. त्यातील काही भक्त घरात सर्व काही असताना मुल सांभाळ करत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे श्रीनिवास यांच्या लक्षात आले होते. अशा वृद्धांसाठी काम करण्याची ईच्छा असल्याने त्याने शिर्डीत आल्या नंतर शिर्डीत द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केले. मागील 14 वर्षापासुन मोफत ते या अनाथांचा सांभाळ करत आहेत. त्याच्या मागे त्याची पत्नी सुधा तितक्याच खंबीर पणे उभी राहीली आहे.

शिर्डीत निराधारांसाठी हक्काचा आधार 'द्वारकामाई' - विजयवाडा येथील श्रीनिवास यांनी 14 वर्षा पूर्वी शिर्डीत साईबाबांच्या मंदिरापासुन अवघ्या 5 किलो मीटर अंतरावर असलेल्या कनकुरी गावाजवळ द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केले आहे. मुल असुन अनाथ असलेल्या माता पित्यांना वाऱ्यावर सोडणारे कमी नाहीत. या वृद्धाश्रमात शेकडो वृद्ध, अपंग राहातात. पोटाला चिमटे घेऊन लहानाच मोठ करणारऱ्या आई वडीलांना उतरत्या वयात कशा यातना देतात हे या वृद्धाश्रमात आल्यावर समजते. आज या वृद्धाश्रमात, देशातील अनेंक राज्यातील तब्बल 130 वृद्ध, अपंग अनाथ राहतात. त्यात वयाची साठ ते नव्वद वर्षे पार केलेल्या जवळपास एश्शीच्या वर महिला आहेत. या सर्वांची काळजी श्रीनिवास आणि सुधा घेतात. या आश्रमात सर्व भाषिक माता पिता राहतात. त्यांना पोटच्या मुला-मुलींनी सोडुन दिले आहे. अशा परीस्थीतीने ते बेघर झाले. अशांची काळजी पोटचा मुलगा नसलेला श्रीनीवास आणि सुन सुधा घेतायेत.

अनाथांनी व्यक्त केल्या भावना - मुल असुन अनाथ असलेल्या माता पित्यांना वार यावर सोडणाऱ्या, माता पित्याना आता श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी यांच्या रूपात मुलगा आणि सुनबाई भेटली आहे. ज्यांना लहानचे मोठे केले त्यांची वाऱ्यावर सोडले, आणि ज्यांचाशी काही संमध नसलेल्या श्रीनिवास आम्हाला मुलांना पेक्षा चांगलं सांभाळत असल्याची भावना यावेळी अनाथांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.