ETV Bharat / state

रोहित वेमुला प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाल्या... - Nirmala Sitaraman

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 7:27 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राहुल गांधींवर जोरदार टीका
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राहुल गांधींवर जोरदार टीका(Desk)

Nirmala Sitaraman : तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली असून सर्व आरोपींना क्लीन चीट दिलीय. तसंच रोहित वेमुला हा दलित नसल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय. आत्ता याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (ETV Bharat Reporter)

पुणे Nirmala Sitaraman : हैदराबाद विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित वेमुला यानं 2016 साली आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनंतर विद्यापीठासह देशभर सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली असून सर्व आरोपींना क्लीन चीट दिलीय. तसंच रोहित वेमुला हा दलित नसल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय. आत्ता याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय. विशेष सम्पर्क अभियान अंतर्गत पंतप्रधानांच्या विकसित भारत संकल्पनेमधील शिक्षण आणि शिक्षकांचं योगदान या विषयावर पुण्यातील डेक्कन कॉलेज इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण विशेष शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी त्यांनी टीका केलीय.

विरोधकांनी ही घटना रस्त्यावर ओढून आणली : यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "हे प्रकरण विद्यापीठ पातळीवर अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळता आलं असतं. पण मोहब्बत की दुकान उघडणाऱ्या लोकांनी हा मुद्दा संसदेतही नेला." तसंच ती एक दुर्दैवी घटना असून विद्यापीठाला अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळू न देता विरोधकांनी रस्त्यावर ओढून आणली. देश आणि सरकारच्या विरोधात एक कथन रचलं गेलं, अशी टीका निर्मला सीतारामन यांनी केलीय.

देशाची माफी मागावी : आज ज्या लोकांनी या दुर्दैवी घटनेची खिल्ली उडवली आणि कुटुंबाला रस्त्यावर ओढलं त्यांनी या प्रकरणाचं राजकारण केल्याबद्दल संपूर्ण देशाची माफी मागावी. जी समस्या विद्यापीठात चांगल्या पद्धतीनं हाताळली जाऊ शकली असती आणि ती सोडवली जाऊ शकली असती. पण असं न करता याचं राजकारण करण्यात आलं. मोहब्बत की दुकान उघडणाऱ्या लोकांनी हा मुद्दा संसदेतही नेला, असं यावेळी सीतारामन म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. निर्मला सीतारामन यांना बडतर्फ करा; आयआरएस अधिकाऱ्यानं राष्ट्रपतींना पत्र लिहण्यामागं काय आहे कारण?
  2. Budget 2023 : कोविडच्या 3 वर्षानंतर आयकर मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा; निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प
  3. Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून वित्तीय तूट 6 टक्क्यांपेक्षा कमी करण्याची अपेक्षा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.