ETV Bharat / state

पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटवलं; 'एक मराठा, लाख मराठा' घोषणानं उडाला गोंधळ - EVM set on fire

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 10:12 PM IST

EVM set on fire by petrol : सांगोला तालुक्यातील बागलवाडी मतदान केंद्रावर संतप्त युवकानं अचानक मतदान केंद्रात घुसून EVM पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी त्यानं एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

EVM set on fire by petrol
पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटवलं (Reporter ETV Bharat Maharashtra Desk)
कुमार आशीर्वाद यांची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat Maharashtra Desk)

सांगोला(सोलापूर) EVM set on fire by petrol : माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा क्षेत्रातील बागलवाडी येथे एका मतदारानं पेट्रोल टाकून EVM मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळं काही काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया बंद थांबण्यात आली होती. माढा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती. मात्र, मतदान यंत्र जाळल्याचा प्रकार घडल्यानं मतदानला गालबोट लागल्याची चर्चा सांगोला तालुक्यामध्ये सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. तसंच या ठिकाणी वंचितचे रमेश बारस्कर हे देखील उमेदवार आहेत. यावेळी माढा लोकसभेसाठी एकूण 32 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये आज 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केलेली होती. मात्र, बागलवाडी या ठिकाणी एका मतदारानं दुपारच्या सुमारास मतदान यंत्रालाच आग लावल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळं काही काळ मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती. मतदानयंत्रावर त्यानं पेट्रोल टाकून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी मतदाराला ताब्यात घेतलं.

यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, 'या ठिकाणी तीन बॅलेट युनिट असून सर्व बॅलेट युनिट व्यवस्थित आहे. मात्र, कोणाला मशीनबाबत संशय वाटू नये, म्हणून नवीन ईव्हीएम मशीन बसवून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. या मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त आला असून मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आहे. पेट्रोल टाकून पेटवलेली ईव्हीएम मशीनची कंट्रोल युनिट व्यवस्थित आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची आवश्यकता नाही', असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. 'इंडिया' आघाडीचे झेंडे उचलायलासुद्धा...; नगरमधील सभेतून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - PM Narendra Modi in Ahmednagar
  2. विजय वडेट्टीवार पाकिस्तानात...?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल, ठाकरेंवरही हल्लाबोल - Devendra Fadnavis
  3. "शरद पवार आणि राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट...", प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, राजकीय वाद पेटणार? - Prakash Ambedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.