ETV Bharat / state

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; महाराष्ट्राचं मणिपूर होतं की काय? 'या' आमदारानं व्यक्त केली भीती - Maratha reservation

Rajendra Raut On Maratha Reservation : बार्शीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना महाराष्ट्राचं मणिपूर होतं की काय? अशी भीती बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केलीय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 5:39 PM IST

will Maharashtra become Manipur, Rajendra Raut expressed fear over maratha reservation issue
मराठा आरक्षण (ETV Bharat)

सोलापूर Rajendra Raut On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीनं महाराष्ट्र राज्य ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता सोलापुरातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र राज्याची परिस्थिती मणिपूर सारखी होते की काय अशी भीती व्यक्त केली आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललीय. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ताबडतोब विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणीही पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र राऊत यांनी केली आहे.

राजेंद्र राऊत पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

राज्यातील मराठा आमदार आणि इतर आमदारांचे म्हणणे जनते समोर येऊ द्या : अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी रविवारी (8 सप्टेंबर) दुपारी बार्शीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, "विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ताबडतोब विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा आमदार आणि इतर समाजाच्या आमदारांचं म्हणणं लेखी स्वरूपात घ्यावं. तसंच महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, मराठा आमदारांच्या मनात काय आहे, ते सर्व राज्याला कळू द्या. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं किंवा नाही याबद्दल त्यांचं म्हणणं लेखी स्वरूपात घ्या आणि राज्यातील जनतेला कळू द्या", अशी भूमिका राजेंद्र राऊत यांनी स्पष्टपणे मांडली.

महाराष्ट्र राज्याचं मणिपूर होतं की काय? : महाराष्ट्र राज्यात ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावी या मागणीनं जोर धरला आहे. मराठा ओबीसी, किंवा मराठा-मराठा असे वाद निर्माण होऊन महाराष्ट्र राज्याचं मणिपूर होतं की काय अशी भीती राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. "...हा राऊत नाही तर फडणवीसांचा डाव", नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? - Manoj Jarange On Rajendra Raut
  2. "मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका", आमदार राजेंद्र राऊतांचं मनोज जरांगेंना आव्हान - Rajendra Raut On Manoj Jarange

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.