ETV Bharat / state

शत्रूंच्या मनात धडकी भरवणारं भारतीय सैन्याचं प्रमुख शस्त्र आहे 'धनुष गन', जाणून घ्या सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 9:12 PM IST

Dhanush Gun Army
Dhanush Gun Army

Dhanush Gun Army : नागपूर शहरातील मानकापूर स्टेडियम परिसरात भारतीय सैन्याची ओळख व्हावी या उद्देशानं शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं. यात बलशाली आणि शक्तिशाली धनुष गन ठेवण्यात आली होती. याला शाळकरी विद्यार्थ्यांनी विशेष पसंती दिलीय.

भारतीय सैन्याचं प्रमुख हत्यार 'धनुष गन'

नागपूर Dhanush Gun Army : भारतीय सैन्याची सामर्थ्य आणखी मजबूत करण्यासाठी गेल्या काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञानानं नवनवीन उपकरणांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करुन दिली जात आहेत. घुसखोरी करू पाहणाऱ्या शत्रुंच्या मनात स्वदेशी निर्मित 155 MM/45 कॅलिबर धनुष गन सिस्टीमची भीती आहे. धनुष गन अवघ्या तीस सेकंदात 46 किलो वजन क्षमतेचं तीन गोळा तब्बल 36 किलोमीटर अंतरापर्यंत फेकू शकते. त्यामुळंच शत्रूंच्या मनात धनुष गनच्या नावाची धडकी भरलीय.

  • नुकतंच नागपूरच्या मानकापूर स्टेडियम परिसरात भारतीय सैन्याची ओळख व्हावी, या उद्देशानं शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यात बलशाली, शक्तिशाली धनुष गन ठेवण्यात आली होती. धनुष गन कशी कामं करते? किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते? या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांनी आवर्जून घेतली


धनुष मेक इन इंडिया : धनुष गन ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डानं विकसित केलीय. धनुष गन जमिनीवर आणि हवेत फायर करण्यासाठी उपयुक्त सिद्ध झालीय. गरजेनुसार युद्धाच्या वेळी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीसुद्धा ही गन फार उपयोगी ठरलीय. आठ कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही गन ऑपरेट केली जाते. 30 सेकंदात ही गन 46 किलो वजन क्षमतेचे तीन गोळा तब्बल 36 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. गेल्या काही वर्षात धनुष भारतीय थल सेनेचं अत्यंत महत्वपुर्ण शस्त्र म्ह्णून पुढं आलंय. लक्ष्य निर्धारित केल्यानंतर या गनची पुढील सर्व कारवाई ही ऑटोमॅटिकपणं पूर्ण होते.

उंच डोंगरांवर शत्रुंचा खात्मा करण्यास उपयुक्त : भारत-पाक सीमेवर उंच डोंगर आहेत. भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे शत्रु अनेकदा डोंगरात लपून भारतावर हल्ला करत असतात. अशा शत्रुंना उत्तर देण्यासाठी धनुष गनचा उपयोग केला जातो. भारताची सीमा हजारो किलोमीटरची आहे. भारताची सीमा पाकिस्तान, बांगलादेश, चीन, म्यानमार देशासोबत लागलेली आहे. सीमारेषेवरुन अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत शत्रुंचा वेध घेण्यासाठी धनुष गन अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळंच शत्रु भारताच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. एकदा धनुषनं गोळा फायर केला तर दुश्मनांचा खात्मा झालाचं समजा, अशी या धनुषची ख्याती आहे.


हेही वाचा :

  1. शत्रूचा अचूक वेध घेणारा 'लॉरोस कॅमेरा', शत्रूंच्या हालचालींवर ठेवतो सूक्ष्म नजर
  2. भारतीय सैन्य जवानांच्या शौर्य, पराक्रमानं नागपूरचा आसमंत निनादला
  3. "भारतानं 'या' दिवसापर्यंत आपलं सैन्य घ्यावं मागे", मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांचा अल्टिमेटम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.