ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची संस्कृती खराब केली : आमदार रोहित पवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 10:38 PM IST

Devendra Fadnavis spoiled culture
आमदार रोहित पवार

Rohit Pawar On Devendra Fadnavis : शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची संस्कृती खराब केली," असा आरोप रोहित पवारांनी केला.

आमदार रोहित पवार हे देवेंद्र फडणवीसांविषयी बोलताना

सोलापूर Rohit Pawar On Devendra Fadnavis : शरदचंद्र पवार गटाला मिळालेले निवडणूक चिन्ह तुतारी आज (25 फेब्रुवारी) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील संत नामदेव पायरी जवळ त्याचं पूजन करुन विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कर्जत जामखेडचे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची संस्कृती खराब केली," असा आरोप रोहित पवारांनी केला.

बारामती मधून सुप्रियाताईंचाच विजय होणार: आमदार रोहित पवार म्हणाले की, ''सत्तेत असताना लोकांच्या मनामध्ये आणि वागण्यामध्ये अहंकार वाढलेला आहे. शेतकरी, युवा, महिला आणि महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. हाताला काम, पोटाला अन्न याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जातिवाद, धर्मवाद हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे जे नवीन पक्ष, नवीन चिन्ह जे तुतारी घेऊन आले आहे. या नवीन चिन्ह आणि या पक्षावर आम्ही सर्वजण या स्वार्थी तसंच अहंकारी सरकार भाजपाचा पराभव करू आणि मित्र पक्षाचे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत. सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढणार आणि फक्त लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आम्ही लढणार. बारामती मधून सुप्रियाताईंचाच विजय होणार'' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रोहित पवारांची भाजपा नेत्यांवर टीका: भाजपाच्या नेत्यांवर टीका करताना आमदार रोहित पवार बोलले की, ''भाजपाचे नेते छोटे-मोठे पक्ष संपून टाकण्यास सांगत आहेत. भाजपा एकमेव पक्ष राहिला पाहिजे याचा अर्थ आहे. आता आपण हुकूमशाहीकडे जायला लागलो आहोत. 2024 नंतर संविधान या देशांमध्ये राहणार नाही. लोकशाही या देशांमध्ये राहणार नाही. दिल्लीच्या बॉर्डरवरच्या ज्या पद्धतीने सामान्य लोक स्वतःच्या हितासाठी लढा लढण्यासाठी जेव्हा जातील तेव्हा आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल, म्हणजे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल असणार आहे. म्हणून हुकूमशाही संपवण्यासाठी भाजपाला आपल्याला सत्तेतून बाहेर ठेवावं लागेल.''

फडणवीसांनी नेते आणि पक्ष फोडला: देवेंद्र फडणवीस यांच्या वरती निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की, ''2014 नंतर देवेंद्र फडवणीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून आजपर्यंत एकता, समानता या महाराष्ट्रातून नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी नेते फोडले, पार्टी फोडली, पक्ष संपवले. पैशाचा वापर या महाराष्ट्रामध्ये त्यांनीच आणला आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती तसेच संस्कृती जर कोणी खराब केली असेल तर त्याला एकमेव व्यक्ती हे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे केला.''

तुतारी वाजविणाऱ्याला सुगीचे दिवस: पंढरपूर येथे आज तुतारीच्या आवाजानं नामदेव पायरीचा परिसर दणाणून गेला होता. शरद पवार गटाला मिळालेले चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस यांना सुगीचे दिवस आले. ते आज पंढरपूरमध्ये दिसून आले. तब्बल पन्नास तुतारी वादक हे अकलूज वरून आज बोलाोवले होते. पवार यांनी नामदेव पायरीजवळ तुतारीचे रणशिंग फुंकून निवडणुकांचा बिगुल वाजवला.

हेही वाचा:

  1. 'आंदोलन संपवण्यासाठी मला मारण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
  2. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील संप मागे, सरकार आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
  3. शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय 'यांची' हेडलाईन होत नाही; सुप्रिया सुळेंची टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.