ETV Bharat / state

Cricket Match Issue: मैदानावर सचिन, 'बीग बीं'ना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 9:50 AM IST

Cricket Match Issue: मैदानावर सचिन, अमिताभला पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
Cricket Match Issue: मैदानावर सचिन, अमिताभला पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Cricket Match Issue : ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानावर आयएसपीएल टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी गर्दी केल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

ठाणे Cricket Match Issue : ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानावर आयएसपीएल टेनिस क्रिकेट स्पर्धेचं 6 मार्च ते 15 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं होत. मात्र या स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी झालेल्या गोंधळामुळं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात काहीजण जखमी झाले आहेत.

अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमेंची मोठी गर्दी : शुक्रवारी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुंबई आणि कोलकत्ता क्रिकेट संघात अंतिम सामना होता. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. तिकीट असतानाही या ठिकाणी प्रमाणाबाहेर गर्दी झाली होती. त्यातच अनेक प्रेक्षक विनातिकीट दादोजी कोंडदेव मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. या मैदानाच्या गेट क्रमांक तिनवर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचा विपरित परिणाम होऊन प्रेक्षकांनी गेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यात लहान मुलं आणि त्यांचे पालक पडले. या गर्दीत धक्काबुक्कीमध्ये लहान मुलं आपल्या आई, वडिलांपासून दूर झाले होते. तसंच काही क्रिकेटप्रेमी महिला प्रेक्षकही जखमी झाल्या. आयएसपीएलच्या ढिसाळ नियोजनामुळं क्रिकेट प्रेक्षकांना धक्काबुकीच्या गर्दीचा त्रास सहन करावा लागला. यामुळं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

सचिन, अमिताभ यांना पाहण्यासाठी गर्दी : दादोजी मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सैफ अली खान तसंच इतर अभिनेते, अभिनेत्री यांना पाहण्यासाठी मैदानाच्या बाहेर आणि मुख्य रस्त्यावर अनेक नागरिक उभे होते. पण गेटवर गर्दी झाल्यानं तसंच दादोजी कोंडदेव मैदानाच्या मुख्य गेटवर क्रिकेटप्रेमींनी कोंडी केल्यानं ही धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी गेटवर गर्दी करु नये, असं आवाहन नागरिकांना केलं. पोलिसांनी काही वेळात गर्दीवर सौम्य लाठीचार्ज करत नियंत्रण मिळवलं. मात्र, काही वेळ या संपूर्ण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. दरम्यान याप्रकारचे सामने भरवण्यासाठी योग्य नियोजन आणि पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीय.

हेही वाचा :

  1. Ranji Trophy 2024 Final : रणजीमध्ये मुंबईच 'अजिंक्य', 15 धावांत 5 विकेट्स घेत विदर्भाचा 169 धावांनी पराभव; 42व्यांदा जिंकली स्पर्धा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.