ETV Bharat / state

संभाजीनगरात 'काळरात्र'! कपड्याच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू - Fire in Sambhajinagar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 6:43 AM IST

Updated : Apr 3, 2024, 10:40 AM IST

Fire in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात तीन मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव; सहा जणांचा होरपळून मृत्यू
संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव; सहा जणांचा होरपळून मृत्यू

कपड्याच्या दुकानाला भीषण आग

छत्रपती संभाजीनगर Fire in Sambhajinagar : शहरातील छावणी कॅन्टोन्मेंट परिसरातील तीन मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागलीृ. या दुर्घटनेत एकाच कुटंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय. छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ ही घटना घडली. रात्री तीन वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्यासाठी कॅन्टोन्मेंट अधिकारी, कर्मचारी व छावणी पोलीस आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. मृतांमध्ये दोन बालक, तीन महीला व दोन माणसांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले की, "पहाटे चार वाजता छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्टोन्मेंट परिसरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली नाही. परंतु प्राथमिक तपास केला असता आम्हाला वाटते की, सात व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे."

संभाजीनगरात 'काळरात्र'! कपड्याच्या दुकानाला भीषण आग

रमजान महिन्यात दुर्दैवी घटना- ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे घटनास्थळी पोहोचले. माजी खासदार चंद्रकांत खेरे म्हणाले, " रमजान महिन्यात दुर्दैव घटना घडली आहे. मुस्लिम बांधव हे रमजानकरिता सकाळी लवकर उठतात. मात्र, त्यापूर्वीच ही आग लागली आहे. ही आग एवढी भयानक होती की, त्यांना घरातून बाहेर पडता आले नाही. कपड्यांमुळे आणि लाकडी फर्निचरमुळे वेगाने आग लागली. धुरामुळे गुदमरून सात लोकांचा मृत्यू झाला. फायर ब्रिगेडचे अधिकारी वेळेवर पोहोचले."

दोन महिला व मुलांना वाचविले- आगीचे प्रत्यक्षदर्शी सचिन दुबे म्हणाले, "साडेतीन वाजता स्फोट झाल्याचा आवाज आला. कदाचित त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जरमुळे स्फोट झाला असावा. कपड्यांच्या दुकानामुळे आग वेगानं लागली. भाडेकरूंना कुलरमुळे आगीचा आवाज आला नाही. तळमजल्यावर दुकान असून पहिल्या मजल्यावर मालक राहत होते. तर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर भाडेकरू राहतात. वेगाने धाव घेत दोन महिला व मुलांना वाचविले आहे".

  • ही आहेत मृतांची नावे- मृतांची संख्या सहावरून सात झाली आहे. आसिम वसीम शेख ( 3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष ), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष), हमीदा बेगम ( 50 वर्ष), शेख सोहेल 35 वर्ष, रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा-

  1. Bhiwani Mattress Factory Fire : भिवानीतील गादी कारखान्याला भीषण आग, अनेक किलोमीटरवरुन दिसतोय धुराचा लोट - Fire Incident At Bhiwani
  2. शिवाजी नगर येथील सेंट्रल प्लाझा कॉम्प्लेक्स इमारतीला भीषण आग - fire broke Central Plaza Complex
Last Updated :Apr 3, 2024, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.