ETV Bharat / state

रश्मी बर्वे यांना निवडणूक लढविता येणार नाही, जात वैधता प्रमाणपत्रावर नागपूर खंडपीठाची अंतरिम स्थगिती - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 1:01 PM IST

Updated : Apr 4, 2024, 2:22 PM IST

Rashmi Barve : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र तसंच जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रकरणात अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र, रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांना निवडणूक लढविता येणार नाही.

Rashmi Barve
रश्मी बर्वे

नागपूर Rashmi Barve : नागपूर रामटेक मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यांचं निवडणूक नामांकन रद्द केलं आहे. बर्वे या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. ही जागा काँग्रेससा सोडण्यात आली होती. आज न्यायालयात सुनावणी होऊनही बर्वे यांना दिलासा मिळाला नाही.

जात वैधता प्रमाणपत्र बनावट ? : रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आव्हान देण्यात आलं होतं. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं त्यांचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचं कारण देत रद्द केलं होतं. त्यामुळं बर्वे यांचा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा अर्ज अवैध ठरवत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.

जात प्रमाणपत्र रद्द करण्यास स्थगिती : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यास तात्पुरती स्थगिती दिली असताना, रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. बर्वे यांना त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत अंतरिम दिलासा मिळाला असला, तरी त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

श्यामलाल बर्वे यांना उमेदवारी ? : निवडणूक आयोगानं राज्यातील लोकसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरू केल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. रामटेकमध्ये सुवातीच्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं रश्मी यांचा उमेदवारी अर्ज नाकारला, तरी त्यांचे पती तसंच काँग्रेसचे श्यामलाल बर्वे या मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राजू पारवे यांना उमेदवारी : रश्मी बर्वे यांनी शेवटच्या क्षणी त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करणे हे 'राजकीयदृष्ट्या प्रेरित' असल्याचा आरोप केला आहे. या प्रकणात त्या कायदेशीररित्या आव्हान देणार आहे. रश्मी बर्वे यांचा सामना करण्यासाठी महायुतीनं दोन वेळा खासदार कृपाल तुमाने यांच्या जागी सत्ताधारी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपानंही याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हे वाचलतं का :

  1. उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या नवनीत राणांना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - Navneet Rana
  2. संभाजीनगरच्या 'त्या' आगीप्रकरणी महावितरणचा अहवाल; अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड - Sambhajinagar Fire Update
  3. खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला महायुतीमधून विरोध, शिंदे गट उमेदवार बदलणार? - Lok Sabha election 2024
Last Updated : Apr 4, 2024, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.