ETV Bharat / state

भाजपानं विश्वासघात केला, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 7:03 PM IST

MP Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे. आता कोणतीही बैठक होणार नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. ते आज शिर्डीत बोलत होते.

MP Sanjay Raut
MP Sanjay Raut

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिर्डी MP Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज (दि. 2) शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाष्य केलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यावर आता कोणतीही बैठक होणार नाही. जागा वाटपाचे सर्व निर्णय झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या जागांवर निर्णय घेऊ, असं राऊत यांनी म्हटलंय. तसंच वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. आंबेडकरांसह शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांची बैठक होणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.


शिर्डीची जागा शिवसेना लढवणार : शिवसेना शिर्डीची जागा लढवणार आहे. या जागेवर शिवसेना सातत्यानं विजयी होत आहे. आमच्या पक्षानंही येथे प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक पक्ष चर्चेत असणाऱ्या जागा मागत आहे. कार्यकर्ते आग्रह करतात, पण पुढं जावं लागतं. भाजपानं आमच्यासोबत युती तोडून विश्वासघात केलाय. 2014 मध्ये युती कोणी तोडली? त्यानंतर मातोश्रीचं निमंत्रण घेऊन कोण आलं असा सवाल राऊत यांनी केला. काल निधीवरून एका मंत्र्याला मारहाण झाली. सुदैवानं 'ती' वेळ येथील पालकमंत्र्यांवर आली नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.

शरद पवार असतील तर धमाका होणारच : सरकार राज्याचं असतं कोणत्याही पक्षाचं नसतं. मोदींनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. बेरोजगारी ही देशातील गंभीर समस्या आहे. सरकार कोणाचंही असो, त्यांनी या विषयावर निर्णय घेतला, तर त्याचं स्वागतच करायला हवं. राजकीय लढाया बाजूला ठेवाव्यात. पण, कोणी आश्वासनं पूर्ण केली तर स्वागत आहे. बारामतीत शरद पवारांनी अनेक उद्योग आणून रोजगार दिला. त्यामुळं त्यांचा धमाका बारामतीत होणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का :

  1. 'दादां'ना पीएमसी देईन, मात्र गृहखातं देणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी घेतली अजित पवारांची फिरकी
  2. शिंदे गॅंगमध्ये आता 'गॅंगवॉर' सुरू; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला
  3. शरद पवार यांची पुन्हा राजकीय खेळी? जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच 'या' उमेदवारांचा प्रचार सुरू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.