ETV Bharat / state

गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोईच्या संपर्कात असलेल्या गॅंगस्टरला पुण्यातून अटक, दोन देशी पिस्तुलासह मॅकझीन जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 6:44 PM IST

bully in touch with gangster
गॅंगस्टर लॉरेन्स

Bully Arrested: गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिन्सोईच्या संपर्कात असलेल्या गुन्हेगाराला अकोट पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. (Gangster Lawrence Bishnoi) त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीनं या कुख्यात गुंडाला पकडण्यात आलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आज (4 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

अकोला Bully Arrested : पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सांगितलं की, अकोट पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी अकोला, अकोट रस्त्यावरील अकोला नाक्याच्या पुलाखाली एका लाल रंगाच्या दुचाकीसोबत दोन संशयित युवक असून त्यांच्याकडे देशी कट्टे आहेत. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अजय तुलाराम देठे, प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. (gangster Shubham Lonkar) पोलिसांनी त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, एक रिकामी मॅकझीन, ९ काडतूस जप्त केली.

गुडांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा मुख्य साथीदार शुभम रामेश्वर लोणकर (रा. अकोट, ह. मु. भालेकर वस्ती, वारजे, पुणे) हा असल्याचं सांगितलं. त्याचा ठावठिकाणा घेतला असता तो उज्जैन येथे असल्याचं समोर आलं. परंतु पोलीस पोहोचेपर्यंत तो पुण्यात निघून गेला होता. पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सिंग यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून यातील आरोपींची आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे.


  • व्हिडीओ कॉलवरून संभाषण: पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत शुभम लोणकर हा बोलत असल्याचं त्याच्या मोबाईलवरून दिसून आलं. तसेच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिन्सोई याच्याही तो संपर्कात आहे. त्याच्या मोबाईलवर अनेक आंतरराष्ट्रीय कॉलही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


मोबाईल डाटावरून आरोपी वाढण्याची शक्यता: शुभम लोणकर हा बिन्सोई गॅंगच्या संपर्कात असल्याचं त्याच्या मोबाईलच्या व्हिडीओ कॉलवरून दिसून येत आहे. त्यासोबतच तो आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाशीही संपर्कात आहे. मात्र तो नेमका कोणाच्या संपर्कात आहे, याचा आता आम्ही तपास करीत आहो. त्याच्या मोबाईल डाटावरून पूर्ण सत्य समोर येईल, अशी माहितीही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली आहे.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गॅंगस्टर असून तो सध्या दिल्लीतील तिहाड जेलमध्ये कैद आहे. त्यानं सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी आणि यापूर्वी पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅंगने स्वीकारली होती. त्यानं कॅनडामध्ये खलिस्तानवादी गुंड सुखविंदरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेतही बिश्नोई गॅंगचा हात असल्याचं चौकशीतून समोर आलं होतं. या गॅंगचे पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर भारत आणि कॅनडात नेटवर्क आहे.

हेही वाचा:

  1. परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्याला यूपी एटीएसनं केली अटक; आयएसआयसाठी काम केल्याचा आरोप
  2. छगन भुजबळांना रामदास आठवलेंनी दिली 'RPI' प्रवेशाची ऑफर
  3. अरविंद केजरीवालनंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले आतिशींच्या घरी, आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी बजावणार नोटीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.