ETV Bharat / sports

पंजाब किंग्जची दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सनं मात, खलील अहमदची हॅटट्रिक हुकली - ipl 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 3:39 PM IST

Updated : Mar 23, 2024, 7:51 PM IST

PBKS vs DC live score
PBKS vs DC live score

आयपीएलच्या 17व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगडमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पंजाबनं ४ विकेट राखून हरवलं.

नवी दिल्ली : महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जनं सॅम कुरनच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. पंजाबकडून सॅम कुरननं सर्वाधिक ६३ धावा केल्या.

पंजाब किंग्जनं शानदार सुरुवात : 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं शानदार सुरुवात केली. धवन आणि बेअरस्टो यांच्यात पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी झाली. धवननं 16 चेंडूत 22 धावा केल्या. जॉनी बेअरस्टो 9 धावा करून धावबाद झाला. प्रभसिमरन सिंगनं 17 चेंडूत 26 धावांची खेळी केली. जितेश 9 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवनं दोन बळी घेतले.

दिल्ली कॅपिटल्सनं केल्या 174 धावा : तत्पूर्वी, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाचे खेळाडू डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श यांच्यात पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी झाली. 12 चेंडूत 20 धावा करून मार्श बाद झाला. डेव्हिड वॉर्नरनं 21 चेंडूत 29 धावा केल्या. शाई होपनं 25 बॉलममध्ये 33 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंतनं 13 चेंडूत 18 धावांची खेळी केली. रिकी भुईनं तीन धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स (5) धावा करत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अक्षर पटेल 13 चेंडूत 21 धावा करून धावबाद झाला. अभिषेक पोरेलनं 10 चेंडूत 32 धावा केल्या. अर्शदीप, हर्षलनं यावेळी 2-2 विकेट घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग 11 : ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

पंजाब किंग्स प्लेइंग 11 : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक :

  • कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
  • गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.
  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वा.
  • सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30
  • लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा.
  • गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 PM
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30
  • गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30
  • सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
  • लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30

हे वाचंलत का :

  1. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या चेन्नईची विजयी सुरुवात - IPL 2024 OPENING MATCH
  2. कोहलीच्या नावावर आणखी एक 'विराट विक्रम'; भारतीय फलंदाजांना जमलं नाही ते भाऊनं केलंय - Virat Kohli T20 Runs
  3. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजपासून आयपीएलचा 'तडका'; नव्या कर्णधारासह गतविजेते मैदानात - IPL 2024 CSK vs RCB
Last Updated :Mar 23, 2024, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.