ETV Bharat / spiritual

'या' राशीचे लोक प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकतील, वाचा राशी भविष्य - Today Horoscope

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 2:36 AM IST

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य (Maharashtra Desk)

  • मेष : चंद्र आज मेष राशीत आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडं सुद्धा लक्ष द्यावं लागेल. धन प्राप्ती संभवते.
  • वृषभ : आजचा दिवस शारीरिक आणि मानसिकदृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळं मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद झाल्यानं घरातील वातावरण ताणावाचं होईल. कष्टाच्या मानानं अपेक्षित प्राप्ती होणार नाही. त्यामुळं आर्थिक चिंता निर्माण होईल. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय आज घेऊ नये.
  • मिथुन : आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी आणि संततीकडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. स्त्री मित्रांकडून लाभ संभवतो. प्रवास आनंददायी होतील. स्वास्थ्य उत्तम राहील.
  • कर्क : नोकरी - व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील आणि त्यामुळं पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. मातेशी चांगले संबंध राहतील. धन, मान-सन्मान मिळेल. घर सजावटीत आपण रस घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकारकडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल.
  • सिंह : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्‍या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. नोकरी - व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस आणि विमनस्कता जाणवेल.
  • कन्या : आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहावं. महत्वाचे निर्णय किंवा जोखीम यापासून वाचण्यासाठी विल, विरासत इत्यादीत अडचणी निर्माण होऊ शकतात. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्यानं मन उदास होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ आणि रहस्यमय गोष्टीत रूची राहील.
  • तूळ : आजचा दिवस यशस्वितेचा आणि आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. त्यांच्या वापरासाठी संधी सुद्धा मिळेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.
  • वृश्चिक : आज कौटुंबिक शांतीचं वातावरण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूंवर मात करू शकाल. आईच्या घराण्याकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. आजारी व्यक्तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसेल.
  • धनू : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य आणि अभ्यास यामुळं चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्यानं निर्माण होण्यार्‍या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभेल. प्रिय व्यक्तीसह सुखद क्षणांचा अनुभव घेता येईल. साहित्य आणि लेखन क्षेत्रात रस राहील. वाद - विवाद आणि बौद्धिक चर्चा यापासून दूर राहणं हिताचं होईल.
  • मकर : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्यानं मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. जलाशयापासून सावध राहावं लागेल. एखादी धनहानी आणि मानहानी संभवते.
  • कुंभ : चिंता दूर झाल्यानं मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळं पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे आणि स्नेही याच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल.
  • मीन : वाद आणि संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावं लागेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल.

हेही वाचा -

कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य 07 ते 13 एप्रिल - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.