ETV Bharat / politics

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सोनिया गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला; नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 10:15 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महिलांना एक लाख रुपये देऊन ‘महालक्ष्मी’ नावाची योजना सुरू करण्यात येईलस, असं जाहीर केलं होतं. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच मतदान चालू असताना अशी गोष्ट करायची म्हणजे सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केलाय.

Neelam gorhe
नीलम गोऱ्हे (ETV BHARAT)

प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे (Mumbai Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आाचारसंहिता भंग केल्याचा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केलाय. निवडणुकीच्या तोंडावरती महिलांची दिशाभूल करणारी विधानं करण्यामध्ये मविआच्या नेत्यांची मोठी स्पर्धा चालली आहे, असं त्यांनी सांगितलंय.

सोनिया गांधी यांनी केला आचारसंहिता भंग : "काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केलं की, महिलांना एक लाख रुपये देऊन ‘महालक्ष्मी’ नावाची योजना सुरू करणार. म्हणजेच बाजारात तुरी अजून आहे त्याच्या आधीच महिलांना कुठेतरी आश्वासन फक्त देऊन सांगायचं, ते सुद्धा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान चालू असताना, अशी गोष्ट करायची म्हणजे सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे. आतापर्यंत बचत गटांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळवून द्या, हे वारंवार सांगून सुद्धा केंद्र सरकारनं केलं नव्हतं, याउलट केंद्र सरकारचं नवीन आलेलं महिला धोरण, स्त्री केंद्री बजेट महिलांना विधानसभा, लोकसभेत आरक्षण असे अनेक निर्णय अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर मोदी सरकारनं केले आहेत. त्यामुळं महिलांची दिशाभूल करणारा सोनिया गांधी यांचं आश्वासन आहे."

सोनिया गांधी यांची घोषणा विश्वासार्ह नाही : "केवळ राजकीय भांडवलाचा प्रयत्न, रेवन्नाची केस असेल किंवा इतर केसेस असतील त्याच्यामध्ये केवळ राजकीय भांडवल करण्यासाठी काँग्रेस या प्रकारचे उद्योग सातत्यानं करत आहे, परंतु कल्पना गिरीची केस असेल किंवा तंदूर कांड असेल अशा अनेक बाबतीमध्ये काँग्रेसचे महिलांच्या संदर्भात विशेषतः असणारी प्रचंड वासनांध भूमिका आणि त्या पक्षामधले अनेक लोक हे सगळ्या समाजाचाच भाग असल्या सारखं आपल्याला दिसून येतं आहे. त्यामुळं सोनिया गांधी यांनी जी घोषणा केली आहे ती अजिबात विश्वासार्ह नाही," असं मतही शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. संजय राऊत प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा स्वप्ना पाटकर यांना धमकीचा फोन - डॉ. नीलम गोऱ्हे - Neelam Gorhe PC Mumbai
  2. "मतदान करणार पण महिलांना हवीय समस्यांची सोडवणूक"; नीलम गोऱ्हे Exclusive ऑन 'ईटीव्ही भारत' - Lok Sabha Election 2024
  3. सरकारनं विदर्भातील जनतेला न्याय दिला, नीलम गोऱ्हे यांच्याकडून सरकारच्या कामांची माहिती - Neelam Gorhe Mumbai PC
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.