ETV Bharat / politics

"मतदान करणार पण महिलांना हवीय समस्यांची सोडवणूक"; नीलम गोऱ्हे Exclusive ऑन 'ईटीव्ही भारत' - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 7:10 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्त्री आधार केंद्र पुणे आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (स्वायत्त), पत्रकारिता आणि जन संज्ञापन विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं 'महिला मतदार राजकीय सक्षमीकरण आढावा' पहिला टप्प्याचं सर्व्हेक्षण करण्यात आलंय.

Lok Sabha Election 2024
नीलम गोऱ्हे
प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे

मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यातील 90 टक्के पेक्षा अधिक महिलांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा आहे. काही महिलांना नेमकी निवडणूक कशासाठी आहे, हे माहीत नसलं तरी मतदान करणार आहेत. मात्र, महिलांच्या विविध समस्यांची अद्यापही सोडवणूक झाली नसल्याची या महिलांची भावना आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिलीय. स्त्री आधार केंद्राच्या वतीनं करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही निरीक्षणे समोर आल्याचं डॉ. गोऱ्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

२०० महिला मतदारांचं सर्वेक्षण : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्त्री आधार केंद्र, पुणे आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं 'महिला मतदार राजकीय सक्षमीकरण आढावा' पहिला टप्प्याचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील २०० महिला मतदारांचं सर्वेक्षण एका प्रश्नावली फॉर्मच्या माध्यमातून करण्यात आलं. पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक अभ्यासाचा भाग म्हणून उत्स्फूर्तपणे सर्व्हेक्षण केलं. महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि त्यांच्या उमेदवारांकडून असणाऱ्या अपेक्षा याचा अभ्यास केल्याचं, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

महिलांनी व्यक्त केल्या भावना : महिलांना वेगवेगळ्या समस्या जाणवत आहेत. त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. निवडणूक नेमकी का घेतली जाते याबाबत विचारलं असता लोकप्रतिनिधी निवडणं आणि विकासकामे करण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूका होणं आवश्यक असल्याचं या महिलांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, पुरुषांच्या तुलनेत महिलांना पगार कमी आहे, हुंडा घेतला जात आहे, लैंगिक अत्याचारात आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, महिलांना राजकारणात स्वतंत्र काम करण्यास वाव मिळावा, महागाई आणि सिलेंडर दर कमी व्हावेत, ईव्हीएमद्वारे पारदर्शक निवडणूक पार पडाव्यात, महिलांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार हवा, असं मत महिलांनी सर्वेक्षणात मांडल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं.

पुन्हा एकदा सर्वेक्षण : एप्रिल महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा अशाप्रकारे दुसरी प्रश्नावली घेऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आत्ताच्या सर्वेक्षणात विविध क्षेत्रातील २०० महिलांशी चर्चा करण्यात आलीय. सर्व वयोगटातील या महिला असून महिला मतदार यांच्यासाठी खास काही मुद्दे घ्यावेत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. सर्व राजकीय पक्ष आणि महिला आघाडी प्रमुख यांना हे मुद्दे आम्ही देणार आहोत. त्याचप्रमाणं प्रत्येक उमेदवारानं महिलांचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. महिलांना निवडणूक जवळ आलीय हे माहिती असतं. पण त्यातील नेमकी माहिती आणि महिलांचे मुद्दे उमेदवारांपर्यंत पोहचवणं, हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.

महिलांना स्वच्छतागृहे हवीत : राज्यात ८० टक्के ठिकाणी महिलांकरीता स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधले जातात, पण महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले जात नाहीत. राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर साफ स्वच्छतागृह असणं बंधनकारक करावं. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. महिलांना पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं.

लोकसभेत शिवसेनेला पुरसे प्रतिनिधीत्व : लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटापेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला अधिक जागा मिळाल्याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, टप्पानिहाय निवडणूका होत असल्यानं काही टप्प्यांचं उमेदवार अजून घोषित व्हायचे आहेत. मात्र, ज्या स्तरावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा सुरू आहेत ते पाहता आम्हाला पुरेसे प्रतिनिधीत्व मिळेल, यात शका नाही, असा दावा त्यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam
  2. मी देशासाठी लढतोय, 'देशी'साठी नाही; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिभा धानोरकरांवर जोरदार टीका - Lok Sabha Election 2024
  3. एकनाथ खडसे करणार भाजपा प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.