ETV Bharat / politics

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, कोल्हापुरात प्रचाराचा 'सुपर संडे' - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 11:09 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघात प्रचाराचा आज (5 मे) शेवटचा दिवस असून, 7 मे ला तिसऱ्या टप्पातील मतदान पार पडणार आहे.

third phase voting election campaign ends today
लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा (etv bharat)

कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडणार असून त्यातील दोन टप्प्यातील मतदान पार पडलंय. तर आता 7 मे रोजी तिसऱ्या टप्पातील मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. तर आज (5 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसंच आज सायंकाळी पाच वाजता या प्रचार तोफा थंडावणार आहेत.

कोल्हापुरात प्रचाराचा 'सुपरसंडे' : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात महिन्यापासून चुरशीनं सुरू असलेल्या प्रचाराचा आज शेवट होणार आहे. आज रविवार असल्यानं जिल्ह्यात प्रचाराचा 'सुपरसंडे' पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात तर धैर्यशील माने यांच्यासाठी इचलकरंजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरात घरोघरी जात प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. यामध्ये आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होत असल्यानं या लढतीकडं सर्वांचंच लक्ष लागलयच. महायुतीकडून धैर्यशील माने, मविआकडून सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह वंचित बहुजनचे डीसी पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


जिल्ह्यात लागू होणार बंदी आदेश : आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात येणार आहे. तसंच कलम 144 लागू झाल्यानंतर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात येणार आहे. हा आदेश मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू असणार आहे. मतदान पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस जिल्ह्यात 'ड्रायडे' पाळण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची शरद पवारांवर कुरघोडी, ५० वर्षानंतर पहिल्यांदाच बदलावी लागली 'ही' गोष्ट - Baramati lok Saba election 2024
  2. लोकसभा निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी 10 देशांचे नेते भारतात, बांगलादेशची अवामी लीग महत्त्वाची का? - Foreign Delegates In India
  3. उत्तर मध्य मुंबईत आता होणार तिरंगी लढत, एमआयएमनं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिला उमेदवार - lok sabha election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.