ETV Bharat / politics

"प्रसिद्ध नट तर घ्यायचा"; जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला - Jayant Patil On Govinda

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 10:49 PM IST

Jayant Patil On Govinda
जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

Jayant Patil On Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा (Actor Govinda Ahuja) यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदा यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावर जयंत पाटील (Jayant Patil) प्रतिक्रिया दिलीय. प्रसिद्ध नट तरी घ्यायचा असा सल्ला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलाय.

मुंबई Jayant Patil On Govinda : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची नावांची घोषणा टप्प्या टप्प्यानं होत आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. अभिनेता गोविंदा आहुजा (Actor Govinda Ahuja) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला. प्रसिद्ध नट तरी घ्यायचा असा सल्ला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलाय.


प्रसिद्ध नट तरी घ्यायचा : अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत. त्यांचा शेवटचा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर काहीतरी पाहिजे, चालणारा तरी नट घ्यायचा असं सल्ला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलाय.



भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा आमची : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यलयात पार्लमेंटरी कमिटीची बुधवारी बैठक पार पडली. आमच्या वाट्याला ज्या दहा-अकरा जागा येणार आहे. त्या जागांवरील संभाव्य उमेदवारांची चर्चा केली. यातील काही उमेदवार शरद पवारांना, अनिल देशमुख यांना भेटले आहे. उद्या आणि परवा एकत्र बसून उमेदवार जाहीर करू अशी माहिती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आम्ही अजून अधिकृत जाहीर केला नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा आमची आहे आणि आमचीच राहील. तुम्ही वेगळं काही सुरू करू नका, असं आवाहनही त्यांनी केलंय.


जनमत सत्तारूढ पक्षाचे विरोधात जाईल : काही आमच्या बाजूच्या लोकांना खोट्या नोटीसा दिल्या जात आहेत. तरी देखील अनेक नेते आणि कार्यकर्ते महाविकासा आघाडीत सामील होत आहे. याचं समाधान आहे. खोट्या नोटीसा ऐनवेळी दिल्यानंतर महाराष्ट्रातील जनमत सत्तारूढ पक्षाच्या अधिक विरोधात जाईल. महाविकास आघाडीतील जागा वाटपात एक दोन निर्णय बाकी आहे ते लवकर होईल अशी आशा देखील पाटील यांनी व्यक्त केलीय. राजू शेट्टी यांच्या मतदारसंघाच्या संदर्भात ठाकरे शिवसेनेला ठरवायचं आहे. महाविकास आघाडीत अतिशय चांगला समन्वय आहे.




आंबेडकरांच्या ट्विटवर काय म्हणाले : प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांना केलेल्या प्रश्ना संदर्भात जयंत पाटील म्हणाले की, असं काही घडणं हे शक्य वाटतं नाही. आजही प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावं असं आम्हाला वाटतंय. भाजपाला हरवायचं असेल तर त्यांनीसोबत आलं पाहिजे. मी बुधवारी त्यांच्यासोबत बोललो त्यांनी प्रस्ताव मान्य करावा, अशी त्यांना मी विनंती केलीय. त्यांनी एक पाऊल मागे घ्यावा आणि प्रत्येक गोष्टीवर इशू तयार करण्यापेक्षा, आमच्या तिन्ही पक्षांसोबत यावं असं आवाहन त्यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. अमरावतीमध्ये महायुतीत फूट? नवनीत राणांचा प्रचार करण्यास बच्चू कडूंचा स्पष्ट नकार, म्हणाले, "राणांविरोधात उमेदवार..." - Bacchu Kadu
  2. शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसेंचं नाव नाही - Shinde Shiv Sena 8 candidates
  3. अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात; "नवनीत राणांचा गेम करणार" - Amravati Lok Sabha Constituency
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.